Homeमहाराष्ट्र'भगवंतराव' चे कौटुंबिक सोहळ्याद्वारे ११४ व्या वर्षात पदार्पण; अॉलिम्पिक पदक विजेते स्वप्निल...

‘भगवंतराव’ चे कौटुंबिक सोहळ्याद्वारे ११४ व्या वर्षात पदार्पण; अॉलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यांची उपस्थिती

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय यासह विविध क्षेत्रातील घडामोडींचे साक्षीदार असणारे व ११३ वर्षांची शतकोत्तर परंपरा लाभलेले ‘भगवंतराव’ मिठाई व रेस्टॉरंट हे नागपंचमीच्या सुमुहूर्तावर नाशिककरांसाठी खुले झाले आहे. विख्यात नेमबाज व अॉलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यांची उपस्थिती या कौटुंबिक सोहळ्याचे वैशिष्टये ठरले. 

मेनरोडवरील पूर्वीच्या जागेत उभारण्यात आलेल्या नवीन व प्रशस्त वास्तूमध्ये ‘भगवंतराव’ चा ११४ वा वर्धापन दिन सोहळा उत्साह व उत्सवी वातावरणात संपन्न झाला. अॉलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सुहास अष्टपुत्रे, मंगलाताई अष्टपुत्रे, अक्षय अष्टपुत्रे, सौ. कोमल अष्टपुत्रे, कु. मिशिता यांच्यासह गुजरातमधील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी अतुल बारोट, सौ. अर्शी बारोट, ऋषी बारोट तसेच रा.स्व.संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश गायधनी, ‘नामको’ चे संचालक प्रफुल्ल संचेती, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, विद्या देशपांडे, विठ्ठल देशपांडे, राजाभाऊ पाटेकर, आनंद दातार, विजय दातार, आर्किटेक्ट सागर काबरे, राजेंद्र ओढेकर, दिलीप सुंगधी, जगदीश भुतडा, मिलिंद मनोहर, देवेंद्र शहा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सातासमुद्रापार किर्ती पसरलेल्या नाशिकच्या मिसळचे जनक म्हणून ‘भगवंतराव’ ला नाशिककरांचीच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून पसंती लाभली आहे. खाद्य पदार्थ, मिठाई तसेच दिवाळीचा खमंग फराळ हे ‘भगवंतराव’ चे वैशिष्टये. ‘भगवंतराव’ च्या या खाद्य परंपरेचे कौतूक करताना अॉलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यांनी मिसळीचाही आस्वाद घेतला. शतकोत्तर परंपरा लाभलेल्या ‘भगवंतराव’ ची यापुढील काळातही अविरत वाटचाल सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्यानंतर नाशिककर खवय्यांची ‘भगवंतराव’ मध्ये गर्दी उसळली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!