Homeशहर व जिल्हागावठाणाचे घडवू या भविष्य...निवडून आणा धनुष्य ! प्रभाग १३ मध्ये शिवसेना उमेदवारांची...

गावठाणाचे घडवू या भविष्य…निवडून आणा धनुष्य ! प्रभाग १३ मध्ये शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच !!

नाशिक । प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्य्यात आलेली असताना शनिवारी अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या उपमुख्यमंत्री व ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड जाहीर सभेने शहरातील राजकीय वातावरण बदलले आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्येही तरुण रक्त व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी मतदार एकवटले असून विकासापासून वंचित राहिलेल्या गावठाणाचे भविष्य घडवण्यासाठी एकमुखाने धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे रश्मी सचिन भोसले (१३ अ), सुवर्णा सचिन मोरे (१३ ब), दिपक रंगनाथ डोके (१३ क), गणेश चंद्रकांत मोरे (१३ ड) या शिक्षित व सर्वमान्य चेहऱ्यांना संधी देत शिवसेनेने सर्वसामान्य मतदारांच्या अपेक्षांची पूर्ती केली आहे. निवडून आल्यानंतर पाच वर्ष चेहरा न दाखवणारे, महापालिकेत मोक्याची पदे भूषवूनही प्रभागासाठी काहीही न करणारे कथित नेत्यांपेक्षा कोविड असो वा वैयक्तिक अडचणी, हाकेला ओ देणारे भोसले, मोरे, डोके परिवार मतदारांचा आधार ठरले आहेत.
यशवंत मंडईच्या जागेवर व्यावसायिकांना न्याय देत उभारले जाणारे बहुमजली पार्किंग, मुंबई-पुण्याप्रमाणे ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करणे, शहराच्या नियोजित विकासासाठी नाशिकमध्ये ५०% FSI इन्सेन्टिव्ह लागू करणे, शहरविकासाला चालना देण्यासाठी ९ मीटर रस्त्यावर ३० मीटर उंचीच्या इमारतींच्या बांधकामास परवानगी देणे, सिडकोची घरे फ्रीहोल्ड करण्यास मान्यता, गावठाणच्या विकासासाठी ४ FSI चा प्रस्ताव लवकर मंजूर होणे, गोदावरी पूररेषेचे पुनर्सर्वेक्षण करून विस्थापित नागरिकांना लवकरच शिथिलता देणे यासारख्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेना उमेदवारांच्या धनुष्य बाण या चिन्हावर मतदान करण्यासाठी प्रभाग १३ मधील मतदार उत्सूक आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे प्रभाग १३ च्या अंगणात होणारा न भुतो न भविष्यती असा धार्मिक सोहळा. यासाठी भगव्याची कास धरणारा शिवसेना पक्ष मतदारांची पहिली पसंती ठरला आहे. स्मार्ट सिटीवर काम करणाऱ्यांनी टक्केवारीने आपली घरे भरली. परंतू गावठाणाचा चेहरामोहरा बदलायचा असेल तर रश्मी सचिन भोसले (१३ अ), सुवर्णा सचिन मोरे (१३ ब), दिपक रंगनाथ डोके (१३ क), गणेश चंद्रकांत मोरे (१३ ड) हे ताज्या दमाचे शिलेदार सभागृहात जाणे गरजेचे आहे, असा निश्चय मतदारांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!