Homeशहर व जिल्हाखडतर प्रशिक्षण पूर्ण करून १०२ नवप्रविष्ठ अंमलदार पोलीस आयुक्तालयात रुजू

खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १०२ नवप्रविष्ठ अंमलदार पोलीस आयुक्तालयात रुजू

नाशिक – विशेष प्रतिनिधी
भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेले १०२ पोलीस अंमलदार नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस आयुक्तालयात कर्तव्य बजावण्यासाठी रुजू झाले. या नवप्रविष्ठ अंमलदारांचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांना महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी विविध कायदयांचे व शारिरीक प्रशिक्षणासाठी मागील ९ महिन्यांपुर्वी पाठविण्यात आलेले होते. पोलीस भरती झालेले १०२ नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार हे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर येथे रुजू झाले आहेत. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांच्या सन्मानार्थ पोलीस आयुक्त, कार्यालय नाशिक शहर येथे स्नेहभोजनाचा समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

यावेळी,नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करताना आयुक्त संदिप कर्णिक यांनी पोलीस हा शासक नसून तो जनतेचा सेवक आहे या संकल्पनेबाबत माहिती दिली. पोलीस दल हे शिस्तीचे खाते असल्याने कामकाज करीत असतांना प्रामाणिकपणा आणि निष्ठा, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन व अंमलबजावणी करणे, जनतेच्या सेवेचे कर्तव्य, शिस्त व सभ्य वर्तन इत्यांदी कर्तव्य अंगीकारणेबाबत नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांना अवगत केले. तसेच पोलीस ठाणे, शाखा, कार्यालय येथे कामकाज करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी देखील त्यांचे अनुभव व पोलीस दलात पार पाडत असलेल्या विविध कर्तव्याची माहिती नवप्रविष्ठ अंमलदार यांना करून दिली.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे उत्कृष्ट कामकाज करून बक्षिस प्राप्त करणारे नवप्रविष्ठ अंमलदार यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देवुन तसेच सर्व नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांचा देखील पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कर्तव्याकरीता शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!