Homeक्राईमअंबड लिंकरोड परिसरातील स्क्रॅप चोरीची उकल; एकास अटक

अंबड लिंकरोड परिसरातील स्क्रॅप चोरीची उकल; एकास अटक

नाशिक – विशेष प्रतिनिधी
अंबड लिंकरोड परिसरातील ए.ए. ट्रेडर्स या स्क्रॅप
दुकानातून २० टनाहून अधिक स्क्रॅप माल चोरून नेणाऱ्या व या मालाची मराठवाडा येथील जालना शहरात विक्री करणाऱ्या भामट्यास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. चोरीचा माल विक्री केल्यानंतर मिळालेले पाच लाख रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन असा १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, अंबड लिंकरोड येथे असलेल्या ए.ए ट्रेडर्स नावाचे स्क्रॅप भंगार दुकानावरून आयशर गाडी (एमएच ०९ – सीए १०१३) ८,८२, ३६९ रूपये किंमतीचा २० टन २१० किलो माल चोरीस गेला होता. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत यातील आरोपी आसिफ युसुफ पठाण (वय-२९, रा. सुंदरनगर, ता. जि. जालना) हा चंदनझिरा (जि. जालना) परिसरात असल्याचे निष्पन्न केले.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, गुन्हेशाखा युनिट दोनचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, श्रेणी उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक उपनिरीक्षक गुलाब सोनार, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश बोडके, अतुल पाटील, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, परमेश्वर दराडे, प्रवीण वानखेडे यांनी जालना येथे जावून या गुन्हयामध्ये अहोरात्र परिश्रम करून तांत्रिक माहिती व मानवी कौशल्याचे आधारे आरोपी आसीफ पठाण याचा शोध घेतला. तेव्हा आसिफ युसुफ पठाण हा जालना येथील छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील टोल नाक्याचे बाजुला असलेल्या किर्ती ट्रान्सपोर्ट पार्किंगमध्ये आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला असतांना पोलिसांची चाहुल लागताच आरोपी पळु लागल्याने त्यास पथकाने पाठलाग करून जेरबंद केले. या गुन्ह्याची उकल करताना तांत्रिक विश्लेषण शाखेच्या सहायक निरीक्षक तारडे मॅडम यांचेही सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!