Homeमहाराष्ट्रनाशिक येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा

नाशिक येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा

नाशिक – विशेष प्रतिनिधी
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेचे आयोजन दि. ५ व ६ ऑगस्ट रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे करण्यात आले आहे. या दोन दिवसांत चार नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. नाट्य स्पर्धा उद्घाटन तथा पारितोषिक समारंभाचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे असणार आहेत.

मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून नंतर लगेच सकाळी ११ वा. कोकण प्रादेशिक विभागाचे “आवर्त” तर दुपारी ३.३० वा. पुणे प्रादेशिक विभागाचे “डॉक्टर तुम्ही सुद्धा” हे नाटक सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार (दि. ६ ऑगस्ट) रोजी सकाळी १० वाजता नागपूर प्रादेशिक विभागाचे “रंगबावरी” तर दुपारी २ वा. छत्रपती संभाजी नगरचे  “केस नं. ९९”  हे नाटक सादर करण्यात येणार आहे.  बुधवारी दि. (६ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ५.३० वा. नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. उद्घाटन व पारितोषिक समारंभप्रसंगी महावितरणचे संचालक(प्रकल्प/संचालन) सचिन तालेवार, संचालक (वित्त)अनुप दिघे, संचालक (वाणिज्यिक ) योगेश गडकरी, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार आणि नाट्य स्पर्धेचे मुख्य समन्वयक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन दिवस चारही नाट्याचे प्रयोग विनामूल्य असून, नाट्य रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा आणि महावितरणच्या कलावंतांना  प्रोत्साहित करावे असे आवाहन राज्य नाट्य स्पर्धेचे निमंत्रक नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे व  आयोजन समिती सदस्य यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!