Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय...!; जितेंद्र आव्हाड यांच्याकडून दोन नवीन व्हिडीओ...

महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय…!; जितेंद्र आव्हाड यांच्याकडून दोन नवीन व्हिडीओ व्हायरल

नाशिक – विशेष प्रतिनिधी
मोबाईलवर पत्ते खेळणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘एक्स’ वर दोन नवीन व्हिडीओ टाकले असून त्यात, ‘माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो’, असे थेट आव्हान देण्यात आले आहे.

विधीमंडळाचे कामकाज सुरू असताना मोबाईल पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ आ. रोहित पवार यांनी व्हायरल केल्यानंतर राज्यात कृषिमंत्री कोकाटे यांचा निषेध केला जात आहे. शेतकरी अडचणीत असताना तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होत असताना कृषिमंत्री मात्र सभागृहात अॉनलाईन जुगारात व्यस्त असल्याची टीका होत आहे. मात्र ना. कोकाटे यांनी आपण पत्ते खेळत नव्हतो तर युट्यूब पहाताना आलेली जाहिरात ‘स्किप’ करत असल्याची सारवासारव केली होती. त्यातच लातूर येथे कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यावरून आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील व सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी बेदम मारहाण केल्याने मराठवाड्यासह राज्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरुद्ध आंदोलन तीव्र झाले आहे.

आ. आव्हाड यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचा जाहिरात बघत असल्याचा दावा खोडून काढताना दोन नवीन व्हिडिओ ‘एक्स’ वर पोस्ट केले. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हानही आ. आव्हाड यांनी केले आहे. आ. आव्हाड यांनी केलेली पोस्ट….

एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते.
आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो.
महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय...!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!