Homeक्राईमम्हाळसाकोरे शिवारातील सशस्त्र दरोड्याची उकल; वस्तू विक्रीच्या बहाण्याने केली रेकी

म्हाळसाकोरे शिवारातील सशस्त्र दरोड्याची उकल; वस्तू विक्रीच्या बहाण्याने केली रेकी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सायखेडा पोलीस ठाणे ह‌द्दीतील म्हाळसाकोरे शिवारात राजेंद्र मुरकुटे यांच्या निवासस्थानी सशस्त्र दरोड्याची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यातील तिघा सराईतांना अटक करण्यात आली असून एक फरार आहे. तर उर्वरीत तिघे दरोड्याच्याच गुन्ह्यात रायगड जिल्ह्यातील पाली पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी (दि.१४) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी मुंबई शहर, सातारा, रायगड, पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बुलढाणा, सोलापुर, ठाणे जिल्हयांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, दंगा दुखापत, अपहरण, प्रोहिबीशन यासारखे एकूण २३ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. सदर आरोपी हे भाजीविकी, मोबाईल अॅक्सेसरीज विकी, गृहपयोगी चायना वस्तु विक्री करण्यासाठी मोटर सायकलवर येवुन खेडेगावातील वस्त्यांवरील घरांची पाहणी करून, नंतर सर्वजण एकत्र येऊन कट रचुन गुन्हा करत असल्याचे निष्पन्न झाल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितलं.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, १३ जुलैच्या
मध्यरात्रीचे म्हाळसाकोरे शिवारात अज्ञात चोरटयांनी संगणमत करून राजेंद्र मुरकुटे यांचे राहते घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कुटूंबियांना कोयत्याचा धाक दाखवून, जिवे मारण्याचा दम देऊन मुरकुटे यांच्या हातातील सोन्याची अंगठी, तसेच घरातील महिलांचे अंगावरील व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकुण ३,८४,०००/- रूपयांचा किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला, तसेच म्हाळसाकोरे शिवारातील इतर चार घरात देखील प्रवेश करून मारहाण करून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनांबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर व सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विकास ढोकरे यांच्या पथकांनी वरील गुन्हयातील फिर्यादी, साक्षीदार यांनी व प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या आरोपींचे वर्णनावरून, तसेच घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे, उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळवून विशाल रमेश बनसोडे (वय २३, रा. सायने बु।।, ता. मालेगाव), दिलीप अशोक चव्हाण (वय ३०, रा. सोमठाणे, ता. सिन्नर), राहुल नाना चव्हाण (वय २६, रा. कुटेवस्ती, सायखेडा, ता. निफाड) यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता, त्यांनी रायगड व मालेगाव येथील साथीदारांसह घटनेच्या दिवशी रात्रीच्या वेळी मोटर सायकलींवर येवून, वस्तीवरील घरांमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून कोयत्याचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देत महिलांच्या अंगावरील व कपाटातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरी करून नेले, तसेच इतरही चार ते पाच घरांमध्ये कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली. 

तसेच इतर साथीदारांबाबत अधिक चौकशी केली असता, सदर आरोपी हे पाली पोलीस स्टेशन जि. रायगड येथील दरोडयाचे गुन्हयात अटक असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. त्यांची नावे अजय एकनाथ चव्हाण (रा. असारे, ता. खालापुर, जि. रायगड, मुळ रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड), आकाश पंजाबराव चव्हाण (रा. होराळे, पो. वावोशी, ता. खालापुर, जि. रायगड, मुळ रा. युसगाव, जि. छ. संभाजीनगर), सोमनाथ भानुदास चव्हाण (रा. भिलवली, ता. खालापुर, जि. रायगड, मुळ रा. ढालगाव, जामनेर, जि. जळगाव) अशी असून रोहिदास उर्फ बन्नी चव्हाण (रा. अजंग वडेल, ता. मालेगाव) हा फरार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सहायक निरीक्षक विकास ढोकरे, योगिता कोकाटे, पोलीस अंमलदार हेमंत गरूड, सचिन धारणकर, दिपक गुंजाळ, हेमंत गिलबिले, प्रितम लोखंडे, प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने गुन्हा उघडकीस आणताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या पथकाने अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने त्यांची सात पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदर आरोपीतांचे कब्जातुन गुन्हयात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटर सायकल, मोबाईल फोन, लोखंडी कोयता असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!