नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटातील युवती सेना उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविका किरण बाळा दराडे, माजी महिला बाल कल्याण सभापती सीमा गोकुळ निगळ, माजी सभापती पुंडलिक अरिंगळे, माजी नगरसेवक पुंजाराम गामणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. आजच्या पक्षप्रवेशाने नाशिकमध्ये शिवसेना आणखी मजबूत होईल, असा विश्वास यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ना. शिंदे यांनी व्यक्त केला.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार आणि विकासाचे वारे घेऊन आपण आता पुढे चाललोय. मागच्या निवडणुकीत तुमचे चिन्ह धनुष्यबाण होते आणि आताही तुम्हाला धनुष्यबाण हेच चिन्ह मिळणार आहे. तुम्ही सारे स्वगृही परतला आहात. धनुष्यबाण आणि शिवसेनेशी नाशिककरांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. यापुढे आपण सारे मिळून नगरविकास, गृहनिर्माण आणि उद्योग खात्याच्या नाशिकमधील विकासाला चालना देऊ असे आवाहन ना. शिंदे यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, नाशिक जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते तसेच शिवसेना सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

























