नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवसेनेच्या ठाकरे गटाने रविवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिवाजीरोड येथील पुतळ्याजवळ हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा देखील यावेळी शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला. भाषेला विरोध नाही पण मराठीवर अन्याय नको, हिंदी सक्ती बंद करा, महाराष्ट्र वाचवा, मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, राज्य सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

यावेळी उपनेते दत्ता गायकवाड, सुनील बागुल,
जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी, महानगरप्रमुख मामा राजवाडे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर यतीन वाघ, प्रदेश सचिव विनायक पांडे, संपत जाधव, बाळासाहेब पाठक, बाळासाहेब कोकणे, राजेंद्र काजळे, किरण डहाळे, चंदू महानुभाव, राजूभाऊ मोरे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, सचिन बांडे, महिला आघाडीच्या तृप्ती निरगुडे, स्वाती पाटील, श्रद्धा कोतवाल, शोभा दिवे यांच्यासह आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

























