Homeक्रीडा'एमआरएफ' सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार अनुभवण्याची नाशिककरांना संधी; शनिवारी रंगणार स्पर्धा

‘एमआरएफ’ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार अनुभवण्याची नाशिककरांना संधी; शनिवारी रंगणार स्पर्धा

नाशिक – विशेष प्रतिनिधी
‘एमआरएफ’ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा शनिवारी (दि. १ नोव्हे.) नाशिक येथे संपन्न होत आहे. एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेची यंदाच्या वर्षाच्या स्पर्धेतील ही तिसरी फेरी आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून नाशिककरांसह सर्व स्पर्धकांची उत्कंठा वाढली आहे. शुक्रवारी या स्पर्धेची वाहन तपासणी व कागदपत्रांची तपासणी झाली.

या स्पर्धेचे आयोजन ठक्कर डोम, सिटी सेंटर मॉल जवळ, येथे होणार असून शनिवारी १ नोव्हें . २०२५ रोजी सकाळी सराव होणार असून दुपारी १ वाजता मुख्य स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या पर्वणीच लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शाम कोठारी व सुरज कुटे यांनी केले आहे.

विविध आठ गटात हि स्पर्धा होणार असून ११० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. भारत सरकार व आंतरराष्ट्रीय ऑलीम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया एफएमएससीआय या मोटरस्पोर्ट्स महासंघाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. सात वर्ष राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळवलेल्या शाम कोठारी यांच्या अधिपत्याखालील गॉड्स्पीड रेसिंग या संस्थेकडे या स्पर्धेचे सर्व अधिकार असून मागील पंचवीस वर्षांपासून गॉडस्पीड रेसिंग या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहे . 

नाशिकमधील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा सुरज कुटे, मोहन पवार, हर्षल कडभाने, विक्रम राजपूत, अमित सूर्यवंशी, आनंद बनसोडे व सहकारी यांनी सांभाळली असून ट्रॅक बनवण्याचे अत्यंत महत्वाचे व जिकरीचे कामही त्यांनी हाताळले आहे. सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकल साठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात . उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो. दिवसोंदिवस या स्पर्धेतील प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. प्रायोजक व प्रसिद्धी माध्यमांकडून मिळत असलेल्या भरघोस सहकार्यामुळे सर्वच प्रकारच्या मोटरस्पोर्ट्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपले कसब अजमावण्यासाठी स्पर्धकही या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

उत्तम संयोजक अनेक राष्ट्रीय विजेते नाशिकमध्ये तयार झालेले असल्याने मोटारस्पोर्ट्स विश्वात नाशिकचे एक वेगळेच स्थान आहे. नाशिकमधील प्रेक्षकांना देखिल स्पर्धा प्रकारातील बारकावे माहित असल्याने मैदानावर एक वेगळेच उत्साहपूर्ण वातावरण असते. या स्पर्धेसाठी एफएमएससीआय चे मुख्य प्रबंधक म्हणून रवी श्यामदासानी हे काम बघणार आहेत तर मनीष चिटको व सत्यजित नायक हे अधिकारी विशेष निमंत्रित असणार आहेत. वाहन तपासणीस म्हणून अंकित गज्जर तर तांत्रिक समिती प्रमुख म्हणून रवी वाघचौरे हे काम बघणार आहेत.

शाम कोठारी यांच्या मार्गदर्शनानुसार सुरज कुटे व त्यांच्या सहकारी गटाने बनवलेल्या या मार्गावर १५ जम्पस , १ टेबलटॉप , व १ कट टेबलटॉप असणार आहे. तुलनात्मक रित्या बराच वेगवान ट्रॅक बनविलेला असल्याने स्पर्धकांचे कसाब पणाला लागणार असून प्रेक्षकांना मात्र येथे नेत्रदीपक स्पर्धा बघायला मिळेल. एस एक्स १ या विदेशी बनावटीच्या मोटारसायकल साठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळणार असून टीव्हीएस रेसिंग टीम च्या स्पर्धकांचा सहभाग या गटातील रंगात वाढवणार आहे . या स्पर्धेसाठी एमआरएफ टायर लि., टीव्हीएस मोटार कंपनी, पेट्रोनास स्प्रिंटा, सिडवीन एनर्जी, मॉन्स्टर एनर्जी, सलाइफलेर आणि आइओसी सर्वो हे प्रायोजक लाभलेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!