नाशिक – विशेष प्रतिनिधी
रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अँण्ड कल्चलर आणि जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जी. एच. रायसोनी मेमोरियल नाशिक जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रीय खेळाडू व नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. सौ. शर्मिला कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत बाम, संघटनेचे पदाधिकारी पराग एकांडे, योगेश एकबोटे, दिलीप लोंढे व अनंत जोशी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले, खेळ खेळतांना त्यात एकाग्रता व नियमितपणा महत्वाचा असते. स्पर्धेत जिंकणे किंवा हारणे यावर लक्ष देण्यापेक्षा आपला खेळ जास्तीत जास्त चांगला कसा होईल यावर खेळाडूंनी भर दिला पाहिजे. तसेच योग्य आहार, योग्य शिस्त असणे महत्वाचे आहे. स्पर्धेतील सहभागी सर्वं खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धा नासिक जिमखाना, शिवाजी रोड व यशवंत व्यायामशाळा, एम. जी. रोड येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धा १७ विविध वयोगटात स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेत मुले व मुली एकुण ३५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. विशेष म्हणजे लहान खेळाडूं बरोबर ५० वर्षावरील वयोगटात पण अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. तसेच महिला गटामध्ये सुद्धा अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आदित्य आरडे काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनंत जोशी यांनी केले.
पहिल्या दिवशी स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी –
शंकर तिवारी वि. वि. श्रीहरी कांगोकर १५-७, १५-८
हिर शहा वि. वि. जय परदेशी १५-११, १५-२
इशान जोशी वि. वि. प्रतीक शर्मा १५-७, १५-८
मार्गशीर्ष आव्हाड वि. वि. श्रेयस मित्रा १६-१४, १५-३
यश अग्रवाल वि. वि. सुयोग राजगुरू १७-१५, १५-८
ध्रुव वोरा वि. वि. विषमय मिरजकर १४-८, १५-९
अमन चौधरी वि. वि. यशवर्धन पगार १५-८, १५-१४
गंधार पटवर्धन वि. वि. अनुराग जाधव १५-३, १५-३

























