Homeशहर व जिल्हासफाई कामगारांच्या पगारातून दरमहा खंडणी; 'वॉटर ग्रेस' च्या तिघांविरुद्ध गुन्हा

सफाई कामगारांच्या पगारातून दरमहा खंडणी; ‘वॉटर ग्रेस’ च्या तिघांविरुद्ध गुन्हा

नाशिक – विशेष प्रतिनिधी
महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या पगारातून कंत्राटदार दरमहा लूट करत असल्याचा मुद्दा विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला होता. या प्रकरणातील एक काळी बाजू समोर आली असून वादग्रस्त वॉटर ग्रेस कंपनीचे चेतन बोरा, दिपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया यांच्याविरुद्ध सफाई कर्मचाऱ्याच्या तक्रारीन्वये खंडणी, जातीवाचक शिवीगाळ तसेच दमदाटी केल्याबद्दल मुंबई नाका पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार यातील फिर्यादीसह सात कर्मचाऱ्यांच्या पगारातून सन २०२२ ते जून २०२५ दरम्यान दरमहा सहा हजार रुपये घेत १३ लाख १६ हजार रुपये खंडणी स्वरुपात घेतल्याचे तसेच
जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले असून या तक्रारीन्वये वॉटर ग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दिपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२,३), ३५१ (२,३), ३(५), ३ सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

यातील फिर्यादी हे सन २०२२ ते माहे जून २०२५ पावेतो वॉटर ग्रेस कंपनीच्या कार्यालयात व बाहेर रोडलगत सार्वजनिक ठिकाणी अशोका स्कुलच्या पाठीमागे, महानगरपालिका पाण्याची टाकी जवळ, अशोकामार्ग येथे नाशिक महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या वॉटर ग्रेस या कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करीत असतांना कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दिपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजीया यांनी संगनमताने फिर्यादीकडुन नोकरीच्या मोबदल्यात दरमहा सहा हजार रूपये व फिर्यादी सोबतचे वरील सहा कर्मचाऱ्यांकडून देखील त्यांचे नेमणुकीस पासून जून २०२५ पावेतो दरमहा सहा हजार रूपये असे एकुण १३,१६ हजार रूपये बेकायेदेशीरपणे खंडणी स्वरूपात घेतले. त्याचा वापर स्वतःसाठी केला असून त्याबाबत विचारणा केली असता मला व सोबतचे कर्मचाऱ्यांना चेतन बोरा याने आदिवासी म्हणून हिणवत तुम्हाला पैसे दयावचे लागतील. तुम्ही सफाई कामगार असून तुमच्या आदीवासींना हेच काम शोभते, अशी दमदाटी केली.

तर अमर कनोजिया म्हणाला की, तुम्ही साले जंगलात राहणारे आदीवासी असून तुम्हाला हेच पैसे भेटत आहे ते जास्त आहे, तुम्ही खालच्या जातीचे आहात, तुम्ही तुमच्या जातीवरच जाणार तुम्ही सुधारणार नाही जास्त हुशारी केली तर नाशिक शहरात व जिल्हयात तुमचे राहणे मुश्कील करून टाकीन गुपचुप दर महिन्याला सहा हजार रुपये आमचेकडे जमा करायचे असे फिर्यादीला जातीवाचक बोलून अपमानास्पद वागणुक देवून दमदाटी केली. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोडे पुढील तपास करत आहेत.

—————————————————————

विधीमंडळात गाजली होती लक्षवेधी…. 

महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार तसेच आरोग्य विभाग, चालक, व्हॉलमन, सिटी बस कंडक्टर, चालक आणि इतर विभागांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा आमदार देवयानी फरांदे आणि आमदार राहुल ढिकले यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत उपस्थित केला. त्यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.

कंत्राटी कामगारांच्या पगारातून दरमहा ठराविक रक्कम वसूल करून कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितलं. या संदर्भात तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात असल्याचे आ. फरांदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात ‘एसीबी’ अथवा ‘एसआयटी’ यांच्यामार्फत चौकशी करून कष्टकरी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिले होते की, या सर्व प्रकरणांची लवकरच चौकशी केली जाईल. कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर केला जाईल आणि त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने केलेली वसुली व दंड याची चौकशी केली जाईल. या गैरप्रकारात सामील असलेल्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!