पंचवटी – विशेष प्रतिनिधी
देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्यावतीने संस्थेच्या दुर्गा मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय आचार्य अत्रे वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत मराठा शाळेचा प्रणम्य पाठक हा विद्यार्थी विजेता झाला. या स्पर्धेत विविध शाळेतून ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे वक्तृत्व गुण बघावयास मिळाले.
या प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे सुहास पाटील , मकरंद सुखात्मे, अनंत दशपुत्रे, साई कुलकर्णी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सौ. अमृता कवीश्वर व श्रीमती गायत्री विजय शिंगणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निषाद दशपुत्रे, संदीप गोसावी, सचिन निरंतर, राजेंद्र खेडलेकर, विजयकुमार क्षीरसागर, मोहिनीराज कुलकर्णी, व.य. कुलकर्णी, किशोर हिंगणे, प्रशांत निरंतर, अजय चौधरी, सुजाता करजगीकर, अमिता कुलकर्णी, माधवी तगारे, मंजिरी रेडगावकर, विजया म्हैसपुरकर, दीपक जहागीरदार, दीप्ती हिंगणे, दत्तात्रय देवळालकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निषाद दशपुत्रे यांनी केले. तर अनंत दशपुत्रे यांनी आभार प्रदर्शन केले.
– स्पर्धेचा निकाल –
प्रथम पारितोषिक प्रणम्य मंगेश पाठक, द्वितीय – मुद्रा सतीश धनवटे, तृतीय – शांभवी भूषण एडके. उत्तेजनार्थ – श्रेया सागर विसपुते, ओजस करंजीकर, प्रणाली रामेश्वर वरकड, कार्तिकी तुषार पाटील, समीक्षा किशोर गायधनी. सांघिक विजेता संघ – मुद्रा सतीश धनवटे व कार्तिकी तुषार पाटील, मराठा हायस्कूल.

























