नाशिक –
येथे नुकत्याच झालेल्या ए डब्लू इव्हेंट्स आयोजित ‘एमआरएफ… टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक २०२५’ या स्पर्धेचे उत्कृष्ट छायाचित्रण करण्यासाठी आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत अथर्व निरंतर याना दुसरे, तर सचिन निरंतर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. प्रशांत खरोटे यांना प्रथम, तर सतीश काळे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. अनुक्रमे रु. तीन हजार ,दोन हजार व एक हजार, पाचशे व प्रशस्ती पत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप आहे .
वकीलवाडी येथे एका छोटेखानी समारंभात ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष हिंगणे व राष्ट्रीय मोटर सायकलपटू रवींद्र वाघचौरे याच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले. याप्रसंगी ए डब्लू इव्हेंटचे संचालक अमित वाघचौरे आदी उपस्थित होते.

























