नाशिक – विशेष प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत परिमंडळ दोनमधील शहर पोलिसांनी मालाविरुध्दच्या गुन्हयातील जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत करण्यात लक्षणीय कामगिरी बजावली आहे. या मोहिमेत २१४.१९० सोन्याच्या दागिन्यांसह वाहने, मोबाईल असा तब्बल पाच कोटी सात लाख ७२ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मोनिका राऊत यांनी
परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनला मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी यांची नेमणूक करून प्रत्येक महिन्याने अखेरीस जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत करणेसाठी विभागीय सहायक पोलीस आयुक्त, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी व मुद्देमाल कारकून यांना कार्यरत करून लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना ३० जूनपर्यंत रोजी सन्मानाने परत करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार १७ मोटार सायकली, ०४ रिक्षा, ०२ ट्रक, ०१ पोकलैंड जेसीबी, २१ तोळे सोन्याचे दागिने, ०२ फोन असा मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानाने परत करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा नाशिक पोलीसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळवून दिल्या बद्दल फिर्यादी विशेषतः महिला फिर्यादी यांना त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेले वाहने परत मिळाल्याबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या आहेत.



























