Homeक्रीडादहावी-बारावी परिक्षेतील गुणवंतांच्या पाठीवर शिवसेनेची कौतुकाची थाप !

दहावी-बारावी परिक्षेतील गुणवंतांच्या पाठीवर शिवसेनेची कौतुकाची थाप !

नाशिक – विशेष प्रतिनिधी
दहावी व बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे. प्रतिकूल परिस्थिती व स्पर्धात्मक परिस्थिती अशा आव्हानांना पार करत १० वी तसेच बारावी परिक्षांमध्ये लक्षणीय यश मिळवणाऱ्या गुणवंतांच्या पाठीवर कर्तव्यदक्ष नगरसेविका स्व. सौ. सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठान व रविवार कारंजा शिवसेना शाखा यांच्यावतीने शाबासकीची थाप देण्यात आली.

निमित्त होते गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे. या कार्यक्रमाचे आयोजन स्व. सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी भोसले व शिवसेना युवा नेते सचिन भोसले यांनी केले होते. गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच मैदानावर चमकदार कामगिरी करणाऱ्या तसेच स्व. सौ सुरेखाताई भोसले निवासी क्रीडा प्रबोधनीतील खो-खो या खेळा मधील नाविन्य पूर्ण यश संपादन केलेल्या व राज्य पातळीवर तसेच देशपातळीवर नाशिकचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते होते. जिल्हा संपर्क नेते तथा उपनेते विजय करंजकर, शिवसेना महानगरप्रमुख प्रविण तिदमे, मध्य नाशिक विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शशी कोठुळे, उपजिल्हाप्रमुख महेश जोशी, शिवसेना विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण फडोळ ,उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, दांडेकर तालीम संघाचे हिरामण नाना वाघ, सिद्धिविनायक पतसंस्थेचे संचालक पोपट नागपुरे, डॉ. सुषमा दुगड, विश्वास भोसले, सतीश काळे, सुभाष कुलकर्णी, श्रीमती अश्विनी धोपावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षांचा व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सचिन रमेश भोसले व रश्मी सचिन भोसले यांनी केला.

यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. तसेच रश्मी सचिन भोसले यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उपनेते विजय करंजकर यांनी स्व. सौ सुरेखाताई भोसले यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला व हा वारसा असाच पुढे चालू ठेवला त्याबद्दल रश्मी सचिन भोसले यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक व सांस्कृतिक नितीमूल्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या

प्रास्ताविकपर भाषणात सचिन भोसले यांनी सुरेखा हास्य क्लब व स्व. सौ सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठान केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. गुणगौरव सोहळ्याबाबत बोलताना ते म्हणाले, सामाजिक बांधिलकी व परिसरातील विद्यार्थ्यांचा गौरव करून विद्यार्थ्यांनी उंच शिखर गाठावे या उद्दिष्टाने हा गौरव सोहळा ठेवण्यात आला आहे. आभार प्रदर्शनादरम्यान रश्मी सचिन भोसले यांनी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी आम्ही जपण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच सासुबाई स्व. सौ. सुरेखाताई भोसले यांचा अखंड जनसेवेचा वारसा सदैव आम्ही असा पुढे सुरू ठेवू. ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ या शिवसेनेच्या विचाराला धरून भविष्यात पुढे जाऊ असे नमूद करत आलेल्या सर्व मान्यवरांचे व खेळाडूंचे आभार प्रदर्शन केले.

गुणागौरव सोहळा यशस्वी करण्याकरता भूषण चौगुले, महावीर संचेती, राजेश गीते, निरंजन माने , गणेश वैश्य, प्रवीण बोजगे, सिद्धेश हेंद्रे तसेच सुरेखा हास्य क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त व आर्थिक बचत या बाबत गुंतवणूक सल्लागार अविनाश वाळुंजे यांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!