Homeक्रीडाआशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत नाशिकच्या पूजा तांबेचे यश

आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत नाशिकच्या पूजा तांबेचे यश

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
दक्षिण कोरियातील जिचॉन येथे सोमवारी झालेल्या २०व्या आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत भारताच्या रोलर डर्बी संघाने उत्कृष्ट संघभावना, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर उपविजेतेपद पटकावले. या संघात भारतीय संघात महाराष्ट्रातून नाशिकची पूजा नवलनाथ तांबे, कॅरोलिन फर्नांडिस, तेजस्विनी कदम आणि श्रुतिका सरोदे या चारही खेळाडूंनी सहभाग घेतला व देशासाठी यश संपादन केले.

अंतिम फेरीत भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाशी झाला. रोमांचक वातावरणात झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम क्रमांक मिळवला, तर भारतीय संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जपानचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला. भारतीय खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात उत्तम समन्वय, वेग, सहनशीलता आणि कौशल्य दाखवत भारताच्या यशात मोलाचे योगदान दिले. रोलर डर्बी हा खेळ केवळ वैयक्तिक प्रदर्शनावर आधारित नसून संपूर्ण संघाच्या तालमेलावर अवलंबून असतो आणि या खेळाडूंनी त्या संघभावनेचे उत्तम उदाहरण सादर केले.

पूजा तांबे हिने २०२४ साली इटलीमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून देशाचं नाव उज्वल केलं होतं. आता पुन्हा आशियाई पातळीवर  एकदा आपली छाप पाडली आहे. या स्पर्धेसाठी तिने मोहली, राजस्थान बिकानेर व गाजियाबाद दिल्ली या ठिकाणी कोचिंग कॅम्प त्यामधून तिची निवड झाली. 

या यशाच्या मागे महाराष्ट्र राज्य स्केटिंग असोसिएशनचे पी. के. सिंग, श्रीमती आदेश सिंग, ज्ञानेश्वर बुलंगे व श्रीमती सविता बुलंगे, प्रशिक्षक दीपक पवार आणि विनय नकवाल यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आणि नियोजन यांची मोठी भूमिका आहे. त्यांच्या प्रेरणेतून खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला.

हे यश केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे आहे. संघाच्या या उपविजेतेपदामुळे भारताच्या रोलर डर्बी क्रीडा प्रकाराला एक नवी दिशा मिळाली असून, यामुळे येणाऱ्या काळात आणखी खेळाडू या खेळाकडे आकर्षित होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!