Homeक्राईमराहूल धोत्रे हत्याकांड; दोघा संशयितांना जेरबंद करण्यात यश

राहूल धोत्रे हत्याकांड; दोघा संशयितांना जेरबंद करण्यात यश

– उद्धव निमसे मात्र अद्यापही फरारच…

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात झालेल्या बहुचर्चित राहूल धोत्रे हत्याकांडातील फरारी संतोष बाळू मते (वय ४०, रा. दिंडेवाडा, मारूती मंदीरजवळ, नांदूरगाव) तसेच स्वप्निल मदन बागुल (वय ३३, रा. जुना राजवाडा, बुध्द विहारच्या मागे, नांदूरगाव) यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. मात्र यातील संशयित व भाजपाचा माजी नगरसेवक उद्धव निमसे अद्यापर्यंत फरारच आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, २२ अॉगस्टला सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून राहूल धोत्रे व आते भाऊ अजय कुसाळकर यांचा पाठलाग करून धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले होते. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान राहूल धोत्रे याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांसह माजी नगरसेवक उद्धव निमसे याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा रुग्णालय तसेच पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धोत्रे कुटुंबियांची समजूत काढत कारवाईचे आश्वासन दिल्याने २४ तासानंतर अंत्यविधी करण्यात आला होता.

यातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी आडगाव पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके माग काढत असताना युनिट एकच्या पथकातील हवालदार प्रशांत मरकड व मिलींदसिंग परदेशी यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे संतोष मते हा वाडीवऱ्हे गाव, कवटी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने तेथे जावून खात्री केली असता बातमी प्रमाणे कवटी फाटा, गणेश वडापावच्या समोर, पंचवटी अमृततुल्य वाडीवऱ्हे येथून संतोष बाळू मते यास ताब्यात घेण्यात आले.

याच दरम्यान हवालदार विशाल देवरे व प्रविण वाघमारे यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, यातील संशयित स्वप्नील बागुल हा पपया नर्सरी जवळ नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांनी पपाया नर्सरी, नाशिक येथे जावून खात्री केली असता, पपया नर्सरी, सातपूर, नाशिक येथून स्वप्निल मदन बागुल वय ३३ वर्षे राहणार- नांदुरगाव, जुनाराजवाडा, बुध्दविहारच्या मागे, नाशिक यास ताब्यात घेतले.

हवालदार विशाल देवरे व प्रविण वाघमारे यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, यातील संशयित स्वप्नील बागुल हा सातपूर येथील पपया नर्सरी जवळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने पपाया नर्सरी येथे जावून खात्री केली असता, पपया नर्सरी, सातपूर, नाशिक येथून स्वप्निल मदन बागुल हा हाती लागला.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट एक पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, किरण शिरसाठ, हवालदार प्रदीप म्हसदे, मिलींदसिंग परदेशी, प्रविण वाघमारे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, योगीराज गायकवाड, संदीप भांड, नाजीमखान पठाण, रोहिदास लिलके, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, मनिषा सरोदे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!