Homeमहाराष्ट्रसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे आता नाशिकरोडमधील 'आयएसपी' छापणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे आता नाशिकरोडमधील ‘आयएसपी’ छापणार

– विद्यापीठाचा सिक्युरिटी प्रेसशी करार…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विविध प्रमाणपत्र आणि श्रेयांक पत्रकांचा कागद आता नाशिकच्या भारत प्रतिभूति मुद्रणालय अर्थात इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून छापला जाणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा निर्णय असून प्रमाणपत्रांच्या छपाईत सिक्युरिटी प्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण झाल्याने विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे आता अधिक सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असणार आहेत.

इंडियन सिक्युरिटी प्रेस ही देशातच नाही जगात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या प्रेसपैकी एक आहे. भारतासह अनेक देशातील पासपोर्ट, १० रुयांपासून ५० हजारापर्यंतचे मुद्रांक, महसूल विभागाचे मुद्रांक, इलेक्शन सील, लिकर सील, लष्करी आस्थापनांची ओळखपत्रे, देशातील अनेक विद्यापीठे केंद्रीय विद्यालयाचे गुणपत्रके आदींची छपाईची कामे नाशिकच्या या सिक्युरिटी प्रेसमध्ये होतात.

विद्यापीठाच्या प्रमाणपत्राची छपाई पारदर्शक, सुरक्षित, गोपनीय पद्धतीने कशी करावी यासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे, परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. संदेश जाडकर, डॉ. विजय खरे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. संजय तांबट, डॉ. चारुशीला गायखे आदींच्या समितीने सदर खरेदी प्रक्रिया राबवली.

नुकतीच या समितीने इंडियन सिक्युरिटी प्रेसची पाहणी करून अधियाकाऱ्यांशी चर्चा केली. देशातील तीन प्रेसने दाखल केलेली खरेदी प्रक्रिया राबविली. त्यानुसार इंडियन सिक्युरिटी प्रेसला काम देण्याबाबत अहवाल दिला. पूर्वी ६ असलेली सुरक्षा माणके आता १६ होणार आहे. सिक्युरिटी प्रेसची सुरक्षा माणके, कागदाचा नमुना, प्रेसची गोपनीयता आणि विश्वसार्हता आदींमुळे यापुढे प्रो प्रिंटेड स्टेशनरीची खरेदी यापुढे इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून करण्यात यावी यास विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिल आणि खरेदी समितीनेही तत्काळ मंजुरी दिली आहे.

कोट्यवधी रुपयांची बचत होणार…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सारख्या मान्यताप्राप्त विद्यापीठाचे प्रमाणपत्रही इंडियन सिक्युरिटी प्रेस इथे छापली जावी अशी ईच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. बाहेरच्या खाजगी प्रेसला दिल्या जाणाऱ्या निविदेत केवळ ६ सुरक्षा मानके होती. दरही काही पट अधिक होते. त्यामुळे पुणे विद्यापीठावर प्रमाणपत्र कागद खरेदीतील भ्रषाचाराचीही आरोप, चर्चा होत. यावर उपाय म्हणून नाशिकच्या शासकीय इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये छपाई व्हावी अशी मागणी मी २ वर्षापूर्वी मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये केली होती. झालेला निर्णय विद्यापीठाच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. यामुळे विद्यापीठाचे कोट्यवधी रुपयांची बचत होणार असून प्रमाणपत्रेही अति सुरक्षित होणार आहे.

– सागर वैद्य, मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!