Homeशहर व जिल्हामहापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच 'अन्याय'; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके) यांनी स्वपक्षीयांना डावलून उबाठा गटाच्या नगरसेवकांची पाठराखण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नगरसेविका सौ. प्रियंकाताई माने यांनी केला आहे. महापौरांच्या या भूमिकेचा प्रभाग ३ मधील लोकप्रतिनिधींनी जाहीर निषेध केला असून, यामुळे सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

हंडा मोर्चाद्वारे वेधले लक्ष

प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. या प्रभागाच्या हक्काच्या ‘निलगिरी वाघ जलशुद्धीकरण केंद्रातून’ उपलब्ध असलेले पाणी जाणीवपूर्वक द्वारका परिसराकडे वळवले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. या अन्यायाविरुद्ध नगरसेविका प्रियंकाताई माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे ४ वाजता जलशुद्धीकरण केंद्रावर आंदोलन केले होते, तसेच महासभेत ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

प्रशासनाचा निर्णय महापौरांनी फिरवला?

आंदोलनानंतर प्रशासनाने द्वारका परिसराचा पाणीपुरवठा दिवसातून एक वेळ करून प्रभाग ३ ला न्याय देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महापौरांनी प्रभाग ३ मधील भाजपच्या चारही नगरसेवकांना विश्वासात न घेता, उबाठा गटाच्या नगरसेवकांच्या मागणीनुसार द्वारका परिसरात पुन्हा दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे नाशिक महानगर उपाध्यक्ष धनंजय (पप्पू) माने यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हक्काचे पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा माने समर्थकांनी दिला आहे. आता या वादावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“स्वतःच्याच पक्षाच्या नगरसेवकांवर आणि प्रभागातील जनतेवर महापौरांनी केलेला हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या हक्काच्या पाण्यावर हा एक प्रकारे दरोडा असून या पक्षपाती निर्णयाचा आम्ही निषेध करतो.”
— सौ. प्रियंकाताई धनंजय माने, (भाजप नगरसेविका, प्रभाग क्र. ३)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

गावठाणाचे घडवू या भविष्य…निवडून आणा धनुष्य ! प्रभाग १३ मध्ये शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच...

0
नाशिक । प्रतिनिधी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्य्यात आलेली असताना शनिवारी अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या उपमुख्यमंत्री व ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड जाहीर सभेने शहरातील...

error: Content is protected !!