– गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण…
पंचवटी । विशेष प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली. विशेष म्हणजे गेल्या पाच पंचवार्षिक मध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा भाजपने दिलेल्या नवीन चेहऱ्यांना मतदारांनी सर्वाधिक मतांचे पाठबळ दिले आहे. प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण गटातून गौरव गोवर्धने यांना १६७२९ मते तर प्रभाग क्रमांक एक मधील दिपाली गीते यांना १६६४२ मते पडली. पंचवटी विभागात पुरुषांमध्ये अँड गौरव गोवर्धने यांना तर महिलांमध्ये दिपाली गीते यांना सर्वाधिक मते पडल्याचे दिसून येत आहे. यातून मतदारांचा कल बदलला असून नवीन चेहऱ्यांवर अधिक विश्वास असल्याचे मतदानाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या. पंचवटी विभागात एकूण सहा प्रभाग आहेत. निवडणुकांच्या धामधुमीत पक्ष कुठलाही असो प्रत्येक उमेदवार हा मीच निवडून येणार व सर्वाधिक मते घेणार असा दावा करत होते.
त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराने आपली ताकद लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पंचवटी विभागात जवळपास भाजप व शिवसेना यांच्यामध्ये दुरंगी लढत रंगली. मतदार राजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत नवीन चेहऱ्यांना सर्वाधिक मते देत कौल दिला.
प्रभाग क्रमांक तीनचे सर्वसाधारण गटाचे भाजपचे अँड गौरव गोवर्धने यांना १६७२९ मते मिळाली. त्यांनी सामाजिक उपक्रम, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका, कार्यकर्त्यां सोबत असलेला समन्वय, पाठीशी उभा असलेला मित्र परिवार ही जमेची बाजू ठरली. सर्व सामान्यांसाठी कोरोना काळात केलेले काम यातून आपल्या सामाजिक बांधिलकी व आपल्या कार्याचा ठसा उमटविला. पंचवटी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष पद भूषविताना विविध उपक्रम राबवित आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले.प्रचारादरम्यान मतदार राजापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यामुळे गौरव गोवर्धने यांना मतदार राजाने मतपेटीतून सर्वाधिक पसंती देत पंचवटी विभागात सर्वाधिक असे एकूण १६७२९ मते दिली.
प्रभाग क्रमांक एक मध्ये दिपाली गिते यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात केलेलं काम. महिला मंडळाच्या माध्यमातून बचत गट व महिलांसाठी स्वबळावर उभे राहण्यासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींवर त्वरित तोडगा काढण्यासाठी घेतलेली भूमिका आणि कायम ठेवलेला थेट संपर्क याचा मोठा फायदा निवडणुकीत झाला. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदारांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाले. मतदार राजांनी दिपाली गीते यांना १६६४२ मते देत पसंती दिली.
—————————————————-
विक्रमी मतांचे मानकरी नगरसेवक
– अँड गौरव गोवर्धने यांनी १६,७२९ मते मिळवत पहिला क्रमांक
– रिद्धेश निमसे यांनी १३,८९० मते मिळवून दुसरा क्रमांक मिळवला..
– प्रमोद पालवे यांनी १३,५६५ मते घेत तिसरा क्रमांक मिळवला आहे.
—————————————————-
नूतन नगरसेविकांची भरारी
– दिपाली गिते यांनी १६,६४२ मते मिळवत सर्वाधिक मताधिक्य मिळवत प्रथम क्रमांक
– ऐश्वर्या जेजुरकर यांनी १४,७९९ मते मिळवून दुसरा क्रमांक
– इंदुबाई खेताडे यांनी १४,७५२ मते मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.

























