Homeशहर व जिल्हाप्रभाग १ मध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष सरसावला

प्रभाग १ मध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष सरसावला

– महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येणार – आ. खोसकर

पंचवटी – प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१ क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ ड) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पूर्ण ताकदीने प्रचारात उतरला आहे. रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधून इगतपुरी त्र्यंबकेश्र्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी काढलेल्या प्रचार व बाईक रॅलीद्वारे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत शिवसेना (शिंदे) गटाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले. 

महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांनी नाशिकमध्ये युती केली आहे. या युतीने केलेल्या सर्व्हेमध्ये प्रभाग एकमधील चारही उमेदवार विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. रविवारी आ. हिरामण खोसकर यांनी प्रचार फेरीचे नेतृत्व करत शिवसेना उमेदवारांचा विजय प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे आवाहन मतदारांना केले.

मागील २५ वर्ष या प्रभागात महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद आदी विविध पदे केवळ मिरवण्यासाठी उपभोगण्यात आल्याचा आरोप आ. खोसकर यांनी केला. प्रभागातील शिवसेना (शिंदे) चारही उमेदवारांचा विजय झाल्यास महापालिकेत सत्ता स्थापन होणार असून आगामी काळात पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, रस्ते आदी प्रश्न अस्तित्वात राहणार नाही, असे अभिवचन आ. खोसकरांनी दिले.
प्रभाग १ मधील उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ ब),
उर्मिला सुनिल निरगुडे (१ क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ ड) यांचे मतदारांनी ठिकठिकाणी स्वागत करताना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!