नाशिक – विशेष प्रतिनिधी
‘रोटरी क्लब ऑफ नाशिक’ नेहमीच अनोखे व नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविले जात असतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमधील कुमारिका पूजन हा महत्त्वाचा दिवस असून त्या निमित्ताने रोटरी क्लब नाशिकने १०८ कुमारीका पूजनाचा आयोजित केलेला कार्यक्रम हा त्यातीलच एक अनोखा कार्यक्रम होय. यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिकने उन्नती विद्यालय, राहुलजी प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, कुलवंडी मधील १०८ कुमारिकांना आमंत्रित करून त्यांचे पूजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा लीना कुलकर्णी होत्या.
सुरुवातीला त्या कुमारिकांचे हळद-कुंकू अत्तर लावून व फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा करून त्यांचे स्वागत करण्यात आले. अतिशय भक्तिमय वातावरणात प्रत्येक मुलीची पाद्यपूजा करून, त्यांना भोजन व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नेहा मेहेर व रचना चिंधडे यांनी मुलींना स्वच्छतेचे तसेच दातांची निगा कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर, रेखा पटवर्धन, मकरंद चिंधडे, मोना सामनेरकर, सोनाली चिंधडे, वृषाली ब्राह्मणकर, अॅड.राजेश्वरी बालाजीवाले, विश्वजीत दळवी, रोहित देशपांडे व हरीश गोरंटल कार्यरत होते.

























