Homeशहर व जिल्हासंगीत साधना करण्यासाठी जिद्द व मेहनत याबरोबर परंपरेचा आदर करणे गरजेचे -...

संगीत साधना करण्यासाठी जिद्द व मेहनत याबरोबर परंपरेचा आदर करणे गरजेचे – प्रसाद गोखले

– सूर विश्वास कुमारमंच’ हे व्यासपीठ दिशादर्शक…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
भारतीय शास्त्रीय संगीत हे आत्म्याशी नाते सांगणारे, जीवन साधनेचे महत्त्व पटवून देणारे आहे. या कलेची जोपासना करण्यासाठी केवळ मेहनत व जिद्द पुरेशी नसून परंपरा आणि आधुनिक जाणीव यांचा सखोल अभ्यास करणेही तितकेच आवश्यक आहे. हीच परंपरा पुढील पिढीकडे पोहोचवण्यासाठी आणि कुमारवयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सूर विश्वास कुमारमंच’ हे व्यासपीठ दिशादर्शक ठरत आहे. या मंचातून भविष्यात अनेक उत्तम कलाकार समाजासमोर येतील, असे प्रतिपादन शास्त्रीय संगीत तज्ञ व संगीत संयोजक प्रसाद गोखले यांनी केले.

‘कुमार’ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सूर विश्वास कुमारमंच’चे चौदावे पुष्प विश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, येथे उत्साहात फुलले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तबला वादन, संवादिनी वादन तसेच समूह शास्त्रीय गायन अशा विविध सादरीकरणांनी रसिकांची मने जिंकली. संगीताच्या संवर्धनाची आणि कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनाची ही मैफल, उपस्थित रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली.

एकल तबला वादन स्पर्श कर्पे यांनी तीन ताल कायदा व झपताल कायद्याचे मनमोहक वादन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सोलो संवादिनी वादन ऋग्वेद पाठक यांनी राग बिहाग मधुर स्वरात रंगवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
समूह शास्त्रीय गायन पुणे विद्यार्थी गृहाच्या डॉ. काकासाहेब देवधर इंग्लिश माध्यमिक विद्यालयाच्या गीत मंचातील विद्यार्थ्यांनी राग बिहाग सादर केला. तनिष्का कुलकर्णी, आरोही देशपांडे, प्रांजल चिमणकरे, स्पर्श कर्पे, संजीवनी खलाणे, सारा बच्छाव, ऋग्वेद पाठक, मोहित गवळी, भार्गवी कुलकर्णी आणि कस्तुरी विरगावकर या विद्यार्थ्यांनी एकसुरात गायन सादर करत शास्त्रीय रागांची ओळख अधिक ठसवली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनायक रानडे यांनी केले. “शालेय पातळीवर शास्त्रीय संगीताची आवड रुजवावी, यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जातो,” असे ते म्हणाले. या मैफलीच्या मार्गदर्शन अंजली कुलकर्णी होत्या तर सूत्रसंचालन तेजस मालपुरे यांनी प्रभावीपणे केले. आयोजक विश्वास लिलावती जयदेव ठाकूर, ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर आणि संकल्पक विनायक आशा पुरुषोत्तम रानडे आहेत. या उपक्रमास विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (शाखा जलालपूर), विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ आणि ग्रंथ तुमच्या दारी या संस्थांचा मोलाचा सहयोग लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!