Homeधार्मिकसमाज परिवर्तनासाठी स्वामींची ऊर्जा घराघरात पोहोचवा : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

समाज परिवर्तनासाठी स्वामींची ऊर्जा घराघरात पोहोचवा : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

– गुरुपीठात ४७५ गुरुचरित्र … ३६०० नवनाथ पारायण उत्साहात

नाशिक – विशेष प्रतिनिधी
समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाज परिवर्तनासाठी आणि देश, धर्म, संस्कृती रक्षणासाठी श्री स्वामी महाराजांची शक्तिशाली ऊर्जा घराघरात पोहोचवा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा उपस्थित समर्थ सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा कडकडाट आणि स्वामीनामाचा जयघोष केला.

राष्ट्रहित आणि जनकल्याणासाठी गुरुपीठात शनिवारी (१३सप्टेंबर) घेण्यात आलेल्या गुरुचरित्र पारायणात ४७५ जणांनी तर रविवारी (१४ सप्टेंबर) घेण्यात आलेल्या नवनाथ भक्तिसार पारायणात ३६०० सेवेकर्‍यांनी आनंदाने सहभाग घेतला. शनिवारी झालेल्या साप्ताहिक सत्संगात परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, सेवामार्गातर्फे सामाजिक सद्भावना जोपासली जाते. लोकांचे दुःख दूर करण्याचे कार्य केले जाते. देश,धर्म,संस्कृती रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.आज आपण पाहतो आहोत की, आपल्या शेजारच्या देशामध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्ती असो किंवा अराजकता असो त्यामुळे देशाचे नुकसान होते. अशा कोणत्याही आपत्ती पासून देश संरक्षित राहावा आणि जनतेच्या रक्षणाबरोबरच त्यांचे कल्याणही व्हावे हीच सेवामार्गाची भूमिका आहे. त्यामुळेच अब्जचंडी, गुरुचरित्र आणि नवनाथ पारायणासारख्या शक्तिशाली सर्वोच्च सेवा सामुदायिकपणे घेतल्या जातात असे त्यांनी स्पष्ट केले. 

शिवरायांचा जीवनादर्श अंगीकारा..

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून लोकोत्तर कार्य केले. त्यांचा तेजस्वी, गौरवशाली अन् पराक्रमी इतिहास इयत्ता पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व अभ्यासक्रमात समाविष्ट झाला पाहिजे. शिवरायांचा जीवनादर्श प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. ज्यांना शिवराय खरोखर कळले त्यांनी आपल्या शक्तीचा, ताकदीचा उपयोग समाजकार्यासाठी करावा असे स्पष्ट मतही गुरुमाऊलींनी नोंदविले.

बारा लक्ष जप आणि गाणगापूरचा सत्संग..

सेवामार्गाचा मासिक सत्संग २५ ऑक्टोबर २०२५ रोजी गाणगापूर येथील दत्तधामात होणार आहे. या मासिक सत्संगाला येताना सेवेकर्‍यांनी श्री स्वामी समर्थ हा बारा लक्ष जप लिहिलेल्या वह्या सोबत आणून जमा कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले. सेवामार्गाच्या बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागातर्फे गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या एक कोटी गणपती अथर्वशीर्ष पठणाच्या उपक्रमालाही ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. साप्ताहिक सत्संगाला गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!