Homeशहर व जिल्हाप्राणघातक हल्ला प्रकरण; माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

प्राणघातक हल्ला प्रकरण; माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून दोघा युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव
उर्फ बाबा बाबुराव निमसे यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे निमसे यांना अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, २२ अॉगस्ट रोजी सायंकाळी जनार्दन नगर (नांदुर नाका) परिसरात
दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात राहुल धोत्रे व अजय कुसाळकर गंभीररित्या जखमी झाले होते. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे, पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्निल बागुल, सुधीर निमसे, अक्षय अशोक पगार, मेघराज जोजारे, गणेश राजाभाऊ निमसे, रोशन जगताप, सुमित हांडोरे व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यापैकी मेघराज सुनील जोजारे, गणेश राजाभाऊ निमसे, रोशन लक्ष्मण जगताप, अक्षय अशोक पगार, सुधीर उर्फ गोटीराम माधवराव निमसे यांना अटक करण्यात आली होती.

निमसे यांच्यावतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र (कोर्ट क्रमांक ६) न्यायाधीश श्रीमती घुले यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. निमसे यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश भिडे, ॲड. सूरज मंत्री यांनी काम बघितले. सरकारी व बचाव पक्षाचा युक्तीवाद झाल्यानंतर उद्धव निमसे यांना २८ अॉगस्टपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. यावर पुढील सुनावणी होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!