Homeधार्मिकगणेशोत्सवात जास्तीत जास्त गणपती अथर्वशीर्ष पठण करा : गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे

गणेशोत्सवात जास्तीत जास्त गणपती अथर्वशीर्ष पठण करा : गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे

नाशिक – विशेष प्रतिनिधी
स्तोत्र-मंत्रांचे मानवी आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे जास्तीत जास्त पठण करावे आणि प्रत्येकाने किमान पाच झाडे तरी लावावीत असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी केले.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये गुरुपुत्र श्री. मोरे यांच्या उपस्थितीत बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाची मासिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला राज्यासह देशभरातून बालसंस्कार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. मोरे यांनी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सेवामार्गातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उत्सवात प्रत्येक जिल्ह्यातून गणपती अथर्वशीर्षाची २१ लाख आवर्तने पठण झाली पाहिजेत. ही कामगिरी बालसंस्कार प्रतिनिधींनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून करून घेणे गरजेचे आहे. ही फार मोठी सेवा आहे. त्याचप्रमाणे जवळच्या सार्वजनिक गणेश मंडपात जाऊन सायंकाळच्या आरती नंतर बालसंस्कार प्रतिनिधींनी मार्गदर्शन करावे अशी सूचना त्यांनी केली.

प्रत्येकाने किमान पाच झाडे लावावीत…

सेवामार्गातर्फे सध्या एक कोटी महा वृक्षारोपण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. असे आवाहन करतानाच या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे त्यांनी कौतुक केले.

पालक-पाल्य सुसंवाद कार्यक्रम घ्या…

पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद आणि ऋणानुबंध निर्माण व्हावेत यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर पालक सभांचे आयोजन करण्यात यावे, आपापल्या भागातील बालसंस्कार, शिशु संस्कार आणि युवा प्रबोधन वर्ग सुरळीत करावेत, मूल्य संस्कार विभागातील सर्व कार्यरत प्रतिनिधींनी भावी पिढी सुसंस्कारित करण्यासाठी आपला अमूल्य वेळ मूलसंस्कार विभागासाठी द्यावा अशा सूचना श्री मोरे यांनी मार्गदर्शन करताना केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!