नाशिक – विशेष प्रतिनिधी
रोटेरियन सदस्यांनी अभिमान व देशभक्तीच्या भावनेने भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात क्लब अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहण समारंभाने झाली. त्यानंतर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
मुख्य अतिथी मेजर जनरल सायरस पिठावाला यांनी प्रभावी भाषणातून स्वातंत्र्याच्या लढ्यातील बलिदानांची आठवण करून दिली. विशिष्ट अतिथी सौ. माधवी संत यांचा समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. रोटेरियन गौरी पाठक यांनी सहकारी रोटेरियन सदस्यांसह तिरंग्याच्या रंगातील वेशभूषा परिधान करून देशभक्तिपर गीतांचे मनोहारी सादरीकरण केले. त्यांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले होते.
माजी अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी २०२४-२५ या वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करून रोटरी परिवारातील उत्कृष्ट कार्याचा गौरव केला. रोटेरियन मोना सामनेरकर व रोटेरियन अमित पगारे यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. फूड कमिटी अध्यक्षा रोटेरियन वृशाली ब्रह्मणकर यांनी उत्तम सहभोजनाची व्यवस्था केली. तसेच रोटेरियन मयूर तांबे, प्रनाली देशपांडे, राजेश्वरी बालाजीवले व ग्रुपी कॅप्टन विनायक देवधर यांच्या उत्तम समन्वयामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक झाला.
या प्रसंगी वरिष्ठ व माजी अध्यक्ष रोटेरियन यांचीही उपस्थिती लाभली. त्यात पी.पी. रोटेरियन उदयराज पाटवर्धन, मंगेश अपशंकर, मनीष चिंधडे, श्रेया कुलकर्णी, बेनीवाल सर, रोटेरियन रवी महाडेकर, विनायक देवधर, विजय दिनानी, मकरंद चिंधडे, शिल्पा पारख अॅड. विद्दुल्लता ताथेड व रोटेरियन रामनाथ जगताप यांचा समावेश होता. उपस्थितांनी रोटरीच्या ब्रीदवाक्याशी — Service Above Self अर्थात स्वतःपेक्षा सेवा मोठी, पुन्हा एकदा निष्ठा व्यक्त केली.

























