Homeक्रीडा१५ वर्षीय भाग्य धवन याचा राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका; तीन सुवर्णपदकांची कमाई...

१५ वर्षीय भाग्य धवन याचा राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका; तीन सुवर्णपदकांची कमाई करीत महाराष्ट्रासह नाशिकची उंचावली मान

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिकचा भूमिपुत्र भाग्य कुलदीपराज धवन याने राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारात तीन सुवर्ण पदकं पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. तो अवघ्या १५ वर्षाचा असून सब ज्युनियर कॅटेगिरी मध्ये ४९० किलो वजन उचलणारा तो पहिली भारतीय स्पर्धक ठरला आहे.

बिलासपूर (छत्तीसगड) येथे ३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान वर्ल्ड पावरलिफ्टिंग फेडरेशन संलग्न युनायटेड पावरलिफ्टिंग असोसिएशन व बिलासपूर जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, छत्तीसगड यांच्या वतीने आयोजित द मेन/वुमन सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर, मास्टर अशा विविध गटात झालेल्या नॅशनल क्लासिक/इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाग्य धवन याने चमकदार कामगिरी करत तिन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भाग्य धवन याने सब ज्युनिअर कॅटेगिरी मध्ये बेंचप्रेस प्रकारात ११६.५ कि.ग्रा. बॉडीवेट, १२५ कि.ग्रा. वेट क्लासमध्ये ११० कि.ग्रा. वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवला. पॉवरलिफ्टिंग प्रकारात स्क्वॅट – १८० कि.ग्रा., बेंचप्रेस – ११० कि.ग्रा., डेडलिफ्ट – २२० कि.ग्रा. अशा एकूण उल्लेखनीय कामगिरीने सुवर्णपदक पटकावले. डेडलिफ्ट प्रकारात २२० कि.ग्रा. वजन उचलून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे भाग्य धवन यांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!