पंचवटी – विशेष प्रतिनिधी
सरदार चौक पंचवटी येथील चतु:शाखीय ब्रह्मवृंद गायरान ट्रस्ट यांच्या वतीने गोपाल मंगल कार्यालयात दिनांक १० ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कार्यक्रम होतील.
दररोज सकाळी संस्थेच्या विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक व पूजा होणार असून विविध भजनी मंडळाचे भजन, मंगळागौरीचे खेळ, भक्ती गीते, विनोदी नाटक इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मंत्रजागर व रात्री नऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत मोहन उपासनी यांचे ‘वेणुनाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री बारा वाजता उपस्थित ट्रस्टींच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीकृष्ण जन्मोत्स्व करण्यात येणार आहे. या सप्ताहास सर्वानी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मोहन रानडे, कार्यवाह अभय कुलकर्णी, खजिनदार प्रमोद गर्गे तसेच विश्वस्त मनोहर पुजारी, सुभाष जोशी, अजिंक्य साने, सुधीर कावळे व अविनाश भिडे तसेच व्यवस्थापक जितेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.

























