Homeशहर व जिल्हापुरोहित संघातील वाद; एकमेकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

पुरोहित संघातील वाद; एकमेकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
गंगाघाटावरील श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघातील दोन गटांचा वाद आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. संघासाठी दोन स्वतंत्र कार्यकारणी घोषित केल्यानंतर रविवारी दोन्ही गटातील समर्थक एकमेकांवर धावून गेले होते. आता याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अर्ज देत एकमेकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गंगाघाटावरील श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यालयात कार्यकारणी फलक लावण्यावरून दोन गटात वाद झाला होता. पंचवटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य घटना टळली. मात्र आता पोलिसांकडे धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुरोहितांमधील एका गटाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी दिलेल्या तक्रार अर्जात पुरोहित संघाच्या कार्यालयात फलक लावण्याबाबत रविवारी सायंकाळी सतीश शुक्ल व प्रतिक शुक्ल यांनी मज्जाव केला. तसेच अध्यक्ष व पदाधिकारी यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून संस्था कार्यालय मधून हाकलून मारण्याची देखील धमकी देण्यात आली. शुक्ल पिता पुत्राकडून संपूर्ण कार्यकारणी सदस्यांच्या जीवास धोका आहे त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

तर सतीश शुक्ल यांनी दिलेल्या अर्जात, गेल्या अनेक दिवसांपासून रामकुंडावर सामुहिक टोळी करुन हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. रविवारी सायंकाळी चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित पंचभैये सोनल भालचंद्र गायधनी, गौरव पंचभैयै, अतुल पंचभैयै, राहूल आदी २९ जणांनी आमच्या स्थानावर येवून बळजबरीने टेबल खुर्ध्या सरकवून अंगावर चाल करुन आले. सोनल भालचंद्र गायधनी यांचेवर पूर्वीही पंचवटी पोलीस स्टेशनला मारहाणीचे गुन्हे आहेत. वैभव क्षेमकल्याणी यांनी वारंवार एकेरी उल्लेख करुन अर्वाच्च शिविगाळ केलेली आहे व त्याचबरोबर अनेकांनी सुध्दा केवळ दहशत निर्माण करुन आमच्या वंशपंरपरेचे असलेले बैठक स्थान येथे बळजबराने येवून अनधिकृत बोर्ड लावणे, झटापट करुन मारहाण करण्याचा प्रयत् करणे यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे व जिविताला धोका निर्माण झाला आहे. कामात वारंवार अडथळा आणून बदनामी करणे, काम न करु देणे व सातत्याने धमक्या देणे यामुळे मी अस्वस्थ् झालो आहे. कांहीही होवू शकते, म्हणून गुंडांचा बंदोबस्त करावा व आम्हांला संरक्षण द्यावे याचा बंदोबस्त् झाला नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!