Homeधार्मिकमुंबईमधील नाथस्वामी बेकरी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव अपूर्व उत्साहात साजरा

मुंबईमधील नाथस्वामी बेकरी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव अपूर्व उत्साहात साजरा

मुंबई – विशेष प्रतिनिधी
मुंबईमधील लोअर परळ डिलाईल रोड येथील नाथस्वामी बेकरी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव अपूर्व उत्साहात तितक्याच भक्तीभावाने साजरा करण्यात आला. संपूर्ण दिवसभर मठामध्ये भाविकांची दर्शन आणि आशीर्वादासाठी गर्दी उसळली होती.

मठाचे प्रमुख गुरुवर्य श्री. नाथस्वामी यांनी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची विधिवत पूजा केल्यानंतर गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. गुरुपौर्णिमेनिमित्त संपूर्ण मठ टवटवीत सुगंधित फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. मठामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची उभी आणि बैठी सुंदर मूर्ती असून या दोन्ही मूर्ती सजविण्यात आल्या होत्या.

सद्गुरु पाद्यपूजन सोहळा उत्साहात…

दुपारनंतर गुरुवर्य श्री. नाथस्वामी यांचा पाद्यपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. हजारो भाविकांनी पाद्यपूजन करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सद्गुरु श्री. नाथस्वामी गेल्या दोन तपाहून अधिक काळ दीन,दुःखीत, पीडित लोकांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्वामी कार्य विनामूल्य करीत आहेत. भांबावलेल्या भाविकांना धीर, दिलासा आणि धैर्य देण्याचे कार्य या मठाच्या माध्यमातून होते. त्यामुळे मठामध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाद्यपूजनानंतर सायंकाळी आरती आणि त्यानंतर श्री नाथस्वामी यांचा सत्संग पार पडला. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा…

आषाढी एकादशीच्या शुभ पर्वावर मठामध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्रद्धापूर्वक वातावरणात करण्यात आली. आषाढी एकादशीलाही दर्शनासाठी भाविकांनी मठामध्ये गर्दी केली होती. मठामध्ये श्री दत्तात्रय महाराज यांचीही स्थापना झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!