नाशिक – विशेष प्रतिनिधी
विझडम हाय इंटरनॅशनल स्कुलच्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी कार्यकारी पालक शिक्षक संघाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी (दि. ९) संपन्न झाली. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी ॲड. अक्षय कलंत्री यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीत सहसचिव डॉ. मंजुश्री अटल, श्वेता प्रभाकर, सहखजिनदार तेजल पिंगळे यांची निवड झाली आहे. मागील शैक्षणिक वर्षात देखील या पदावर असतांना ॲड. अक्षय कलंत्री यांनी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्यांना प्रभावीपणे मांडून शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या हिताची कामे करून घेण्यात यश आले होते. यावर्षी देखील विद्यार्थी हितासाठी व प्रलंबित योजनावर काम करण्याचा मानस आहे.

























