Homeधार्मिकमथुरेत ऐतिहासिक भागवत सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात.!

मथुरेत ऐतिहासिक भागवत सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात.!

मथुरा –
भगवान श्रीकृष्णाची पुण्यभूमी असलेल्या मथुरेमधील श्रीगोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी अत्यंत चैतन्यदायी वातावरणात श्री स्वामी सेवामार्गातर्फे २७ जूनपासून राष्ट्रहितासाठी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. अखिल भारतातून समस्त सेवेकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे भागवत नगरीत दाखल होत असून या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत ही अतिउच्च सेवेची पर्वणी सेवेकऱ्यांना लाभणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने आणि अद्भुत लीलेने पावन झालेल्या आणि भारलेल्या वातावरणात राधे- राधेचा जयघोष करीत हजारो सेवेकरी या अपूर्व सेवेत सहभागी होणार आहेत. गोवर्धन येथील श्री कार्ष्णि आश्रमाच्या विस्तीर्ण मैदानावरील भव्य मंडपात २७ जून ते ४ जुलै या काळात भागवत सप्ताह होत आहे. या काळात बहुविध उपक्रम आणि विशेष सेवा घेण्यात येणार आहेत. गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्यदिव्य आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे.

भव्य मिरवणूक, विशेष सेवा आणि उपक्रम…

गुरुवार दि.२६जून रोजी श्रीमद् भागवत ग्रंथाची महामिरवणूक काढण्यात येणार आहे तर २७ रोजीo पितरांना सद्गती मिळण्यासाठी श्रीयमुना जलाने पितृतर्पण विधी होईल. त्यानंतर भागवत पारायणाचा प्रधान संकल्प होऊन पठणाला प्रारंभ होईल. २८जून रोजी असाध्य आजार, ग्रहपीडा आणि सर्वापत्ती निवारण्यासाठी श्रीनारायण कवच धारण विधी होईल. २९ जून रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सुयोग्य संतान प्राप्तीकारक श्री संतान गोपाळ मंत्रानुष्ठान व श्रीकृष्ण दोलोत्सव घेण्यात येणार आहे. ३० जून रोजी कन्या विवाहकारक श्रीकात्यायनी पूजन व मंत्रानुष्ठान तसेच धनधान्य समृद्धीकारक श्रीगिरीराज गोवर्धन पूजन व अन्नकोट हा उपक्रम संपन्न होईल. १ जुलै रोजी विवाहकारक श्रीकृष्ण- रुक्मिणी कल्याणोत्सव, २ जुलै रोजी श्री गुरुकृपादायक श्री दत्तात्रय पूजन व मंत्रानुष्ठान, ३ जुलै रोजी वंश वृद्धीकारक श्री द्वादशाक्षर मंत्र पुरश्र्चरण ही सेवा घेण्यात येणार आहे.

४ जुलै रोजी सांगतेला विशेष सेवा…

भागवत सप्ताहाची सांगता ४ जुलै रोजी होत असून या दिवशी श्री महाविष्णू याग, श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन आणि श्री सत्यनारायण पूजन ही विशेष सेवा घेण्यात येणार आहे. ज्यांना सात दिवस पारायण करणे शक्य होणार नाही अशा भाविक, भक्त आणि सेवेकर्‍यांनी ४ जुलै रोजी होणाऱ्या सांगतेच्या सेवेला आवर्जून उपस्थित राहून संपूर्ण सप्ताहाचे प्रासादिक आशीर्वाद प्राप्त करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!