संवाददाता । नाशिक
जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने तालुकानिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीचे वाटप केल्याची माहिती जिल्हा सचिव मसूद जिलानी यांनी दिली आहे.
सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि भगूर ची जबाबदारी जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, खासदार राजाभाऊ वाजे, लोकसभा समन्वयक निवृत्ती जाधव, उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, उपजिल्हाप्रमुख कुलदीप चौधरी, उपजिल्हाप्रमुख भैय्या मनियार, तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, शिवाजी कसबे यांना देण्यात आली आहे.
नांदगाव, मनमाड, येवला आणि चांदवड येथील जबाबदारी. दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर, प्रवीण (पिंटू) नाईक, नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, चांदवड तालुकाप्रमुख विलास भवर, येवला तालुकाप्रमुख छगन आहेर यांना देण्यात आली. तर चांदवड, पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथील जबाबदारी माजी आमदार अनिल कदम, जिल्हाप्रमुख नितीन आहेर, निफाड तालुकाप्रमुख खंडू बोडके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सटाणा तालुक्याची जबाबदारी ग्रामीण जिल्हाप्रमुख पवन ठाकरे, जिल्हा संघटक लालचंद सोनवणे आणि तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे सांभाळतील. तसेच संबंधित तालुक्यांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.




















