Homeशहर व जिल्हासोशल मीडियाच्या युगात ‘रिल्स’च्या प्रभावामुळे कलेची अभिरुची ढोबळ व झटपट प्रसिध्दीची हाव...

सोशल मीडियाच्या युगात ‘रिल्स’च्या प्रभावामुळे कलेची अभिरुची ढोबळ व झटपट प्रसिध्दीची हाव – प्रितम नाकील

नाशिक – विशेष प्रतिनिधी
आजच्या सोशल मीडियाच्या युगात ‘रिल्स’ च्या प्रभावामुळे कलेची अभिरुची ढोबळ होत चालली आहे. कमी वेळात मिळणारी प्रसिद्धी यालाच यश मानले जात असल्याची खंत व्यक्त करत, “अशा काळात ‘सूर विश्वास कुमारमंच’सारखे उपक्रम नव्या पिढीतील कलाकारांना सकस, अभिजात शास्त्रीय संगीताची दिशा देणारे ठरतील,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायक प्रितम नाकिल यांनी केले.

सूर विश्वास कुमारमंच’ चे कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित तेरावे पुष्प विश्वास को-ऑप. बँकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, सावरकरनगर येथे उत्साहात पार पडले. या वेळी श्री नाकिल यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, साधना आणि सातत्य यावर भर देण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमात अनन्या गायधनी, सुषुम्ना कापडणीस, तनिष बोरसे, गीत पटेल आणि आर्यन शिलावत यांनी राग मालकंस सादर करत शास्त्रीय गायन केले. रोनित शिंदे याने सोलो तबला वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विजडम हाय इंटरनॅशनल स्कूल, सिरिन मेडोज कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी समुहशास्त्रीय गायन सादर केले. यामध्ये युगा चौधरी, आरोही सामनेरकर, अद्विक कर्वे, रूद्र पाठक, शौर्य रिपोटे, शार्वी हिरे, कबीर केळकर, पुर्वा निकम, अनय सोनवणे, आरना भावसार, श्रीहान देवरे, सहर्ष तेजाळे, अद्विक नावलेकर, दिवीत नावलेकर यांनी सहभाग घेतला. तबलासाथ अवनिश वानखेडे यांनी केली. तर चित्रकला प्रात्यक्षिक अनन्या सामनेरकर आणि आदित्य काठोळे यांनी सादर केले. संपूर्ण मैफल सिद्धार्थ निकम, सौरभ क्षीरसागर आणि भाग्यश्री कंसारा या गुरूंच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली. सूत्रसंचालन विनया देशपांडे यांनी केले.

‘सूर विश्वास कुमारमंच’ ही शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ आहे. अधिकाधिक रसिकांनी यात सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर व संकल्पक विनायक आशा पुरूषोत्तम रानडे यांनी केले.
या उपक्रमाला विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (शाखा जलालपूर), विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, आणि ग्रंथ तुमच्या दारी या संस्थांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!