नाशिक – प्रतिनिधी
शहरातील अग्रगण्य असलेल्या श्री समर्थ सहकारी बँक अध्यक्षपदी राधाकृष्ण नाईकवाडे तर उपाध्यक्षपदी मनोज बाग यांची बिनविरोध निवड झाली. पदाधिकारी निवडीसाठी सहकार खात्याचे अध्यासी अधिकारी विजय बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया मंगळवारी संपन्न झाली.
यावेळी बँकेचे मावळते अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी व मावळते उपाध्यक्ष राजेश गांगुर्डे, संचालक नरेंद्र कुलकर्णी, रविकिरण निकम, जालिंदर ताडगे, मनोज गोडसे, शिरीष मोराणकर, राजेंद्र खेडलेकर, मंदार ओलतीकर, पुष्कर पाराशरे, मंदार तगारे, योगिता खांडेकर, किशोरी एकबोटे, तज्ञ संचालक सी.ए. रुपाली जुन्नरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चितोडकर, सरव्यवस्थापक दीपक ठाकूर उपस्थित होते.
नवनिर्वाचत अध्यक्ष व पदाधिकारी यांनी बँकेची प्रतिष्ठा राखुन व्यवसाय यशस्वी शिखरावर नेण्याचा मानस व्यक्त केला. या वेळी बँकेचे माजी संचालक बाळकृष्ण कुलकर्णी, सौ. हेमा दशपुत्रे, अरुण भांड, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिन निरंतर, दुर्गा देवी पतसंस्थेचे अध्यक्ष बळीराम चांडोले व उपाध्यक्ष यशोदीप कुलकर्णी, शैलेश बाग, डॉ. जाकीर शेख, उत्तम दोंदे, मकरंद सोमवंशी, दिलीप वाघ, संतोष कदम, उल्हास देशमुख तसेच अजय बोरस्ते, हरिभाऊ लोणारी, अजिंक्य साने, नाना सोमवंशी, विनायक मोरे, अमित घुगे, नानासाहेब देवरे, अरुण पवार आदी उपस्थित होते. तसेच बँकेचे माजी व्हा. चेअरमन मकरंद सुखात्मे, माजी संचालक मिलिंद कुलकर्णी यांनी नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करताना देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिन निरंतर.

























