नाशिक – विशेष प्रतिनिधी
इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ ही मोठी क्रांतिकारी चळवळ सुरू झाली. तेव्हापासून देशाच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. अनेक स्वातंत्र्यवीरांनी या चळवळीत आपले आयुष्य अर्पण केले. अशा वीरांना आठवण करण्याचा हा आजचा अनमोल दिवस आहे. त्यामुळे क्रांती दिनाचे महत्त्व प्रचंड आहे, असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.
क्रांती दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी आकाश छाजेड बोलत होते. ध्वजवंदनाचे संचालन सेवा दलाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक लक्ष्मणराव धोत्रे, शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव, जिल्हा एनएसयुआय चे अध्यक्ष अल्तमश शेख, धोंडीराम बोडके, शहर ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार, शहर काँग्रेस आदिवासी विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष संदीप शर्मा, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तनवीर खान, अखिल भारतीय युवक काँग्रेस सचिव स्वप्नील पाटील, भालचंद्र पाटील, नंदकुमार सूर्यवंशी, राजकुमार जेफ, माणिक जायभावे, संतू पाटील जायभावे, सॅम्युअल अवताडे, समीना पठाण, गुड्डी खान, प्रकाश खले, दर्शन पाटील, प्रशांत गांगुर्डे, जावेद इब्राहिम, साजिया शेख, प्रशांत गांगुर्डे, शहबाज मिर्झा, राहुल सूर्यवंशी, फारुख, मन्सुरी इसाक कुरेशी, विजय चाफळकर, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























