Homeशहर व जिल्हा'सिनेमा कट्टा' उपक्रमांतर्गत नाशिककर चित्रपट प्रेमींसाठी 'फरहा';

‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत नाशिककर चित्रपट प्रेमींसाठी ‘फरहा’;

नाशिक – विशेष प्रतिनिधी
विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, नाशिकतर्फे चित्रपट प्रेमींसाठी ‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.८) सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक दरीन सलाम यांचा ‘फरहा’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.

१५ मे रोजी जगभरात विखुरले गेलेले पॅलेस्टिनी लोक नक्बा दिवस पाळतात. नक्बा या अरबी शब्दाचा अर्थ आहे महा-आपत्ती. नक्बाचे वर्ष जरी १९४८ मानले जात असले तरी ज्या घटनांना नक्बा म्हटले जाते त्या नोव्हेंबर १९४७ ते जुलै १९४९ या काळात घडल्या आहेत. या काळात झियॉनिस्ट अतिरेकी आणि १५ मे १९४८नंतर इझरेली सैन्य यांनी मिळून ७८ टक्के पॅलेस्टाईन शस्त्रबळाने ताब्यात घेतला, १९ लाख अरब लोकांपैकी ७.५ लाख लोकांना रातोरात निर्वासित करून पॅलेस्टाईनबाहेर घालवले व उरलेल्यांपैकी बहुसंख्य अरबांना २२ टक्के भागात कोंडले. ५३० शहरे व गावांमध्ये अरबांचा निर्वंश केला गेला आणि ७० हून जास्त कत्तली नोंदल्या गेल्या ज्यात १५,००० हून जास्त अरब लोक मारले गेले. आजतागायत ही महा-आपत्ती पॅलेस्टिनी लोकांवर वारंवार कोसळत आहे आणि सध्या गाझापट्टी याच महाआपत्ती खाली भरडली जात आहे.

पण हा सिनेमा या सगळ्या मोठ्या गोष्टींबद्दल नाहीय. तो आहे या महा-आपत्तीच्या झंझावातात सापडलेल्या १४ वर्षांच्या फरहा या मुलीबद्दल. ही मुलगी जितकी गोड आहे तितकीच बंडखोर आहे. तिचे वडील गावचे सरपंच आहेत. तिची मोठी स्वप्नं आहेत. तिला शहरात जाऊन शिकायचंय. तिचे वडीलही तिला पाठिंबा देत आहेत. आपल्याला दिसते ते एक छान गाव, तिथलं संथ जीवन, आणि गावात असणाऱ्या लोकांच्या आशा-आकांक्षा. आणि अचानक नक्बा त्यांच्या गावात पोहोचते. तिचे सर्व कुटुंबीय गाव सोडून जातात. तिचे वडील गावाचे प्रमुख असल्याने जाऊ शकत नाहीत. म्हणून ती त्यांच्या सोबत राहायचे पसंत करते. जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा ते तिला एका खोलीत बंद करतात आणि सांगतात की मी लवकर येतो, तू इथून हलू नकोस. आणि ती त्या खोलीच्या दाराच्या फटीतून नक्बा पाहते, अनुभवते. तिचं आधीचं आयुष्य आणि तिने फटीतून अनुभवलेला नक्बा म्हणजे हा सिनेमा.

दरीन सलाम लेखन, दिग्दर्शन दोन्ही करतात. फरहाच्या आधी त्यांच्या पाच लघुपटांनी पारितोषिके पटकावली आहेत. फरहा हा त्यांचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट. ४६व्या टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये तो प्रथम दाखवला गेला व त्यानंतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये त्याला आमंत्रित करण्यात येत आहे. त्यांच्या सुंदर दिग्दर्शनाला तितक्याच सुंदर चित्रीकरणाची व करम ताहेर या आता जॉर्डनमध्ये राहणाऱ्या तरुण पॅलेस्टिनी अभिनेत्रीच्या सुंदर अभिनयाची साथ आहे. आवर्जून पाहा हा चित्रपट, तो तुमच्या नेहमी लक्षात राहील. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी एक तास ३३ मिनिटांचा आहे.

सदर कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर व विश्वास टर्फ यांचे सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लीलावती जयदेव ठाकूर व रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!