Homeधार्मिकगंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातील वाद शमविण्यासाठी आता समन्वय समिती स्थापन

गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातील वाद शमविण्यासाठी आता समन्वय समिती स्थापन

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
येथील गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघामध्ये झालेल्या काही गैरसमजुतीच्या व तात्विक मुद्दयांवरून निर्माण झालेले मतांतर व विसंवाद आणखीन वाढत जाऊन त्याचा पुरोहित संघाच्या एकंदरीत कार्यावर तसेच समाजामध्ये व येऊ घातलेल्या सिंहस्थ सोहळ्यावर परिणाम होऊ नये, याकरीता आता गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश असून पुरोहित संघामधील वाद मिटविण्यास यश येते का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागलेले असेल.

या समितीमध्ये वे. स्मार्त चुडामनी शांतारामशास्त्री भानोसे, किशोर उपाख्य बाळासाहेब गायधनी, सुधीर पैठणकर, उदयन दीक्षित, सोमनाथ बेळे
चंद्रशेखर गायधनी, हेमंतभाई तळाजिया यांचा समावेश आहे. ही समिती लवकरच योग्य असा सर्व मान्य असा मार्ग काढतील अशी अपेक्षा उपस्थित सर्व ज्ञाती बांधवांनी व्यक्त केली आहे.

गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघामधील दोन कार्यकारणी, त्यांच्या धूसफूस, पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलेला वाद या पार्श्वभूमीवर
समन्वयाच्या दृष्टीने पाऊल टाकणे अतिशय गरजेचे आहे, या मतावर सर्व पुरोहितांचे व ब्राह्मण समाजातील मान्यवरांचे एकमत झाले आहे. या अनुषंगाने ज्ञाती समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या सूचना, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना व अपेक्षा, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षांचा सर्वांगाने विचार करून सर्व पुरोहितांनी व पुरोहित संघाने सर्वांना सोबत घेऊन एकीने कार्य करण्याचा संकल्प सोडला आहे.

या अनुषंगाने आगामी काळात कार्यरत राहण्यासाठी समाजातील मान्यवरांच्या अंतर्गत समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय हा प्राथमिक संवादातून निघालेला आहे. या संभाव्य समन्वय समितीमध्ये सात ब्रह्मवृंदाच्या प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. या मार्फत सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी संवाद साधत झालेला निर्णय हा एकत्रित नूतन कार्यकारिणीच्या समोर ठेवला जाईल. या कार्यकारिणीस विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले.

या अनुषंगाने शुक्रवारी (दि.८) समन्वयाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी सिंहस्थ आणि श्री गंगा गोदावरी मातेच्या सेवेत यापुढे सर्वांनी एकीने कार्यरत राहणे, आपसात गैरसमज आणि अनादरास कुठलाही थारा नसेल. एकमेकांची बाजू, विचार ऐकून चर्चा-विनिमयातूनच प्रश्न सोडविले जातील, सुसंवादाद्वारे रचनात्मक कार्य उभे करण्यावर भर राहील , या अनुषंगाने समन्वय समिती आजपासून कार्यरत असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!