Homeउत्तर महाराष्ट्रपुणे विद्यापीठच्या नाशिक उपकेंद्रावर जाण्यासाठी १८ मीटर रस्त्याची मंजुरी

पुणे विद्यापीठच्या नाशिक उपकेंद्रावर जाण्यासाठी १८ मीटर रस्त्याची मंजुरी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर जाण्यासाठी ढकांबे मार्गे १८ मीटर रस्ता करण्यास नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘एनएमआरडीए’ ने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे उपकेंद्रावर जाण्यासाठीचे अंतर अंदाजे ३ किलोमीटरने कमी होणार असून पक्का आणि मोठा रस्ता मिळाल्याने विद्यापीठाचा प्रवास सुलभ होणार आहे.

शिवनाई शिवारात विकसित होत असलेल्या पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राला ९ मे रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देवून पाहणी केली होती. यावेळी माहिती घेताना म्हसरूळ-वरवंडी-शिवनाई मार्गे असलेला रस्ता लहान आणि ९.७ किलोमीटर अंतराचा असल्याने नाशिक- दिंडोरी महामार्ग मार्गे ढकांबे कडून रस्ता मिळाल्यास विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवाही सुरू करता येईल आणि अंदाजे ३ किलोमीटर अंतरही कमी होईल अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी केली होती.

ना. पाटील यांनी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. माणिक गुरसाळ यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. यानंतर व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, उपकेंद्र समन्वयक श्रीपाद बुरकुले यांनी प्राधिकरणाचे आयुक्त माणिक गुरसाळे, उपायुक्त दिव्यांश सोनवणे यांच्याशी संयुक्त बैठक केली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन जागेचे, रस्त्याचे सर्वेक्षण करून पाहणी अहवाल सादर केला. सदर मार्ग ढकांबे पर्यंत राज्य महामार्ग असून तिथून सानप नर्सरी पासून उजवीकडे सध्या कच्चा रस्ताही वापरत आहे.

प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला यासंबधीचे पत्र पाठवून विद्यापीठापर्यंत १८ मीटर रस्त्याचे इस्टिमेट करण्यास सांगितले असून या रस्त्याचा खर्च करण्याचीही तयारी दाखवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक विद्यार्थी, २०० हून अधिक शिक्षणसंस्था आणि हजारो प्राध्यापकांच्या जिव्ह्याळ्याचा विषय असलेल्या नाशिक उपकेंद्राचा रस्ता प्रशस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याकामी आमदार देवयानी फरांदे यांचीही मदत झाल्याची माहिती सागर वैद्य यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!