Homeमहाराष्ट्रत्र्यंबकेश्वर मध्ये रविवार व सोमवारी खासगी वाहनांना प्रवेश बंद

त्र्यंबकेश्वर मध्ये रविवार व सोमवारी खासगी वाहनांना प्रवेश बंद

नाशिक – विशेष प्रतिनिधी
तिसरा श्रावणी सोमवार व त्यानिमित्ताने ब्रम्हगिरी
पर्वतावरील फेरीसाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रविवारी (दि.१०) दुपारी १२ वाजेपासून ते सोमवार (दि.११) रात्री आठ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळ बसेस तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर येथे तसेच ब्रम्हगिरी पर्वतावर फेरीसाठी सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्हा, राज्य व परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार वाहतूक मार्गात बदल व भाविकांच्या वाहनांची बाहय पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे. 

रविवारी (दि.१०) दुपारी १२:०० वाजेपासून ते दि.
सोमवारी रात्री आठ वाजेदरम्यान नाशिककडून त्र्यंबकेश्वर मार्गे जव्हार येथे जाणारी व जव्हारकडून नाशिककडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.

तिसरा श्रावण सोमवार बाहय पार्किंग स्थळे :

– नाशिक कडून त्र्यंबकेश्वरकडे दर्शन व फेरीसाठी जाणारे भाविक हे आपली खाजगी वाहने खंबाळे पार्किंग येथे पार्क करतील. तेथून पुरविण्यात आलेल्या एस.टी. महामंडाळाची शटल बस सेवा घेऊन जुना जव्हार फाटा, गजानन महाराज चौक, सिंहस्थ बसस्थानक याठिकाणी येतील.

– जव्हार व गिरणारे मार्ग त्र्यंबकेश्वरकडे येणारे भाविक हे आपली वाहने आंबोली पार्किंग येथे पार्क करुन पुरविण्यात आलेल्या एस.टी. महामंडळाच्या शटल बससेवेने त्र्यंबकेश्वरकडे येतील.

– मुंबई, इगतपुरी, घोटी, वैतरणा मार्ग त्र्यंबकेश्वर कडे येणारे भाविक हे आपली वाहने पहिने टी-पॉईंट पार्किंग येथे पार्क करुन एस.टी. महामंडळाच्या शटल बससेवेने येतील.भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी खालीलप्रमाणे वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात येत आहेत.
तात्पुरते पर्यायी वाहतुक मार्गामध्ये केलेला बदल व बाहय पार्किंग व्यवस्थेसंदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण कार्यालयाकडून स्वतंत्र अधिसुचना जारी करण्यात आली आहे याची नागरीकांनी नोंद घ्यावी. मात्र आपत्कालीन सेवा वाहनांना प्रवेश खुला राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!