नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग निहाय बैठकीचे या प्रभाग क्रमांक १५ मध्ये नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नागरिकांनी प्रभागातील समस्यांचा पदाधिकाऱ्यांसमोर उहापोह करत त्या सोडवण्यासाठी आग्रह धरला.
माजी उपमहापौर प्रथमेश गिते, सचिन मराठे, राजेश गांगुर्डे, विशाल पवार यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना उपनेते दत्ताजी नाना गायकवाड, उपनेते सुनीलभाऊ बागुल, माजी महापौर व आमदार वसंत गिते, शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी सूर्यवंशी, शिवसेना प्रदेश सचिव विनायक पांडे, माजी नगरसेवक सचिन मराठे, बाळासाहेब पाठक, संजय चव्हाण, बाळासाहेब कोकणे, सौ. किर्तीताई निरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते,
सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक संजय खरे यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत प्रथमेश गीते, राजेश गांगुर्डे, विशाल पवार यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन केले.
या बैठकीत प्रभागातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनी पाण्याचा सध्याचा बिकट झालेला प्रश्न, कॉलनीतील रस्त्याची झालेली दुरवस्था या सुचनेचा व विविध समस्यांचा पाढा वाचुन दाखविला. यावर पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन दिले. येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणूकीत जास्तीत जास्त नगर सेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून महापालिकेत भगवा हा फडकणारच अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीस परिसरातील पी.डी. काळे, अनंत नागवंशी, संजय वानखेडे, मोरे साहेब, रवी सोनणे सर, अशोक तेजाळे, नाना तेजाळे, पालेकर साहेब, दिलीप चाबुकस्वार, जयराम वाघ, अशोक काठे, संजय मैंद, तसेच ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग तसेच शिवसैनिक विद्यार्थी सैनिक युवा सैनिक हे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























