Homeक्राईमशहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोघे हद्दपार

शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोघे हद्दपार

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) किशोर काळे यांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार ऋतिक उर्फ गजाळया वसंत रकताटे (वय-२३, रा. घर नं.४, नेके जिम जवळ, नम्रता चौक, पाटील नगर, सिडको) यास दोन वर्षांसाठी तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील भिमराव (लखन) सुधाकर डांगळे (वय-४०, रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) यास एक वर्षासाठी शहरातून हद्दपार केले आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवणेसाठी तसेच जनतेचे जिवित व मालमत्तेचे संरक्षण होणेसाठी दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले व गुन्हेगारी कृत्य व हालचाली सुरुच ठेवणारे गुन्हेगार इसमांना तडीपार, एमपीडीए. अन्वये स्थानबध्द तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदयान्वये कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.

त्या अनुषंगाने, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) किशोर काळे यांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा आढावा घेवून अधिनस्त विभागीय सहायक पोलीस आयुक्त तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करुन रेकॉर्ड वरील सर्व गुन्हेगारां विरुध्द दाखल गुन्हयांचा, सद्य स्थितीतील वास्तव्य, हालचाली इत्यादींचा आढावा घेवून कायदयाचा, परिणामी पोलीसांचा वचक राहणेसाठी, त्याच बरोबर गुन्हेगार इसमांचे वर्तनात सुधारणा होणेसाठी योग्य ते प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव सादर करणे बाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

ऋतिक उर्फ गजाळया वसंत रकताटे याच्या विरूध्द सार्वजनिक ठिकाणी लोकांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून गंभीर दुखापत करणे, घरात घूसून लोकांना शस्त्राचा धाक दाखवून कापून टाकण्याची धमकी देणे. मालमत्तेचे नुकसान करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे वगैरे दाखल गंभीर ४ गुन्हे दाखल आहेत. तर

भिमराव (लखन) सुधाकर डांगळे याच्याविरुध्द साथीदारांसह बेकायदेशीरपणे जमाव करून, हत्याराचा धाक दाखवून दमदाटी करून मारहाण करणे, गंभीर दूखापत करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, अवैध दारू विक्री करणे वगैरे असे
तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे चालु असलेली तडीपार प्रस्तावाची चौकशी पूर्ण करून त्यांना शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.
शहरात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांचे पासून शहरातील जनतेचे जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे, आगामी सण, उत्सव तसेच नाशिक महानगरपालिका निवडणूक निर्विघ्न व शांततेत पार पाडणे करीता अशा गुन्हेगारां विरुध्द हद्दपारी, स्थानबध्दतेची तसेच मोक्का अन्वये कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यांत येणार आहे.

गुन्हेगार इसम, त्यांचे समर्थक, बेकायदेशिरपणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे सर्वच स्तरातील व्यक्तींनी नैतिक व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपले वर्तनात सुधारणा करावी असा इशारा देवून, नागरिकांनी देखील “साध्या वेशातील पोलीस” म्हणून निर्भिडपणे पोलीसांना माहिती अथवा तक्रारी देवून आपले कर्तव्य पार पाडावे. हद्दपार इसम नाशिक शहर व नाशिक (ग्रामीण) जिल्हयात दिसून आल्यास पोलीसांना माहिती दयावी. जेणेकरुन अशा इसमां विरुध्द, हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाई करण्यांत येईल. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यांत येईल, असे आवाहन किशोर काळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!