Homeक्राईमसावकारी जाचाला कंटाळून मेनरोडवरील युवा व्यापाऱ्याची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून मेनरोडवरील युवा व्यापाऱ्याची आत्महत्या

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सावकारांच्या जाचाला कंटाळून बोहोरपट्टी मधील युवा कपडे व्यापाऱ्याने विषप्राशन केले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना रविवारी रात्री या व्यापाऱ्याचे निधन झाले असून या घटनेने सावकारी व्यवसायाची काळी बाजू पुन्हा प्रकाशात आली आहे.

जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत नटवरलाल उर्फ पप्पू जेठवा (वय ३०, रा. बालाजी हाईटस्, ढिकले नगर, पंचवटी) असे त्या व्यापारी युवकाचे नाव आहे. त्यांचे जुन्या सरकारवाडा परिसरात तयार कपड्यांचे विक्रीचे दुकान होते. तर ते काळाराम मंदिर परिसरात वास्तव्यास होते.

मेनरोडवर बेन्टेक्स दागिन्यांची विक्री करणाऱ्या ‘रवी’ नामक मित्राने प्रारंभी प्रशांतसह अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावून कुटुंबासह पलायन केले होते. यामुळे अडचणीत सापडलेल्या प्रशांतने व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी परिसरातील सावकार बंधूंकडून उसनवार पैसे घेतले होते. मुद्दल व वाढत जाणारे व्याज तसेच सावकारांचा ससेमिरा यामुळे प्रशांत हा विंवचनेत सापडलेला होता. त्रासलेल्या प्रशांत यास सावकारांनी सतत त्रास देणे चालू केल्यामुळे तसेच दररोज दुकानात येऊन रोजची विक्रीही घेतली जायची. विषप्राशन करण्यापूर्वी हेच सावकार बंधू दिवसेंदिवस प्रशांतच्या दुकानात ठिय्या द्यायचे. त्यामुळे तो सतत तणावात वावरत होता, अशीही चर्चा होती. सावकार बंधूंचा सततचा ससेमिरा यामुळे वैतागून प्रशांतने अखेर विषप्राशन केल्याची चर्चा आहे.

प्रशांत यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मार्केट यार्डानजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्याचे निधन झाले. प्रशांतच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. यामुळे परिवारासह मित्रमंडळीत शोक व्यक्त होत आहे. मेनरोडवरील अनेक लहान व्यापारी तसेच हॉकर्स यांना सावकारी पाशात अडकवून त्यांची लूट करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!