नाशिक – विशेष प्रतिनिधी
महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य विद्युत अपघात महावितरण, शुन्य विद्युत अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत संपूर्ण राज्यासह नाशिक परिमंडळामध्ये विविध ठिकाणी असलेल्या महावितरणच्या सर्वच कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी १० ते १०.१५ या वेळेत एकाच वेळी विद्युत सुरक्षाविषयक शपथ घेण्यात आली. यामध्ये महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्याचा संकल्प केला.
महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव मंडळात आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शपथ देण्यात आली याप्रसंगी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे तसेच मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. जगदीश इंगळे, सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र उपस्थित होते.
यासोबतच नाशिक परिमंडळ कार्यालय, विद्युत भवनच्या आवारात जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी उपस्थितांना विद्युत सुरक्षिततेची शपथ दिली. या प्रसंगी नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता राजेश थूल, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंते, नंदकिशोर काले, योगेश निकम, चेतन वाडे, ज्ञानोबा तांदळे व्यवस्थापक मंगेश गाडे, हेमंत भामरे यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यासह नाशिक परिमंडलातील सर्वच विभागीय, उपविभागीय, शाखा कार्यालयामध्ये विद्युत सुरक्षिततेची सर्वांनी सामूहिक शपथ घेतली आणि विद्युत सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला.


























