Homeक्राईमराहूल धोत्रे खून प्रकरण; उद्धव निमसेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

राहूल धोत्रे खून प्रकरण; उद्धव निमसेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात पोळा सणाच्या दिवशी राहूल धोत्रे याचा खून व अजय कुसाळकर याच्या खुनाचा प्रयत्न याप्रकरणी फरार असलेला स्थायी समितीचा माजी अध्यक्ष व भाजपाचा माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे याने सोमवारी शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकासमोर शरणागती पत्करली होती. त्यास
मंगळवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोळा सणाच्या (दि.२२ अॉगस्ट) दिवशी दुचाकीचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादानंतर निमसे समर्थकांनी राहूल धोत्रे तसेच त्याचा आतेभाऊ अजय कुसाळकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवण्यात आला होता. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेताना राहूलचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्याला खुनाचे वाढीव कलम लागले होते.

यात भाजपचा माजी नगरसेवक व स्थायी समितीचा माजी अध्यक्ष उद्धव निमसे संशयित म्हणून समावेश होता. अटक टाळण्यासाठी उद्धव निमसे याने प्रथम जिल्हा न्यायालय व नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दोन्ही ठिकाणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासाबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर निमसे हा सोमवारी गुंडा विरोधी पथकाला शरण आला होता. याप्रकरणी पुढील तपास सहायक आयुक्त शेखर देशमुख करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!