Homeधार्मिकगोवर्धन नगरीत अपूर्व उत्साहात भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाला प्रारंभ

गोवर्धन नगरीत अपूर्व उत्साहात भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाला प्रारंभ

मथुरा – विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दैवी स्पंदनांनी भारलेल्या पवित्र गोवर्धन नगरीत आजपासून (दि. २७ जून) श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाला अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. देशभरातून आलेले सुमारे दहा हजार सेवेकरी या सप्ताहात सहभागी झाले आहेत.

भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवर्धन नगरीत कार्ष्णि आश्रमाच्या भव्य प्रांगणात आजपासून ४जुलै पर्यंत सेवेकऱ्यांचा हा गोपाळमेळा रंगणार आहे. आज सकाळी सात वाजता पितृ तर्पणानंतर विष्णू पूजा त्यानंतर भूपाळी आरती आणि प्रधान संकल्प होऊन प्रत्यक्ष सामुदायिक पठणाला प्रारंभ झाला. त्यानंतर भागवतावर रसाळ निरूपण झाले. दररोज सायंकाळी ६:३० ची महाआरती झाल्यावर गीताई आणि विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण होऊन नामसंकीर्तन झाल्यानंतर दिवसभराच्या सेवेची सांगता होणार आहे. दर दिवशी विशेष सेवांचा अपवाद वगळता अशाच पद्धतीने सेवेचे नियोजन करण्यात आले आहे. एकाच वेळी हजारो सेवेकरी बसून पारायण करतील शिवाय उष्म्याचा त्रास होणार नाही अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सेवेकऱ्यांना सात्विक भोजन आणि निवासाची व्यवस्थाही सेवामार्गातर्फे करण्यात आली आहे.

पूर्वसंध्येला जल्लोषात निघाली महामिरवणूक..

कार्यक्रम स्थळापासून गोवर्धन पर्वतापर्यंत श्रीमद् भागवताची अत्यंत उत्साही वातावरणात, जल्लोषात राधे- राधे आणि स्वामीनामाच्या जयघोषात भव्य महामिरवणूक काढण्यात आली.
उत्साही सेवेकर्‍यांनी श्रीमद् भागवत ग्रंथ डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.भागवत नगरी दाखल झाल्यानंतर गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. भगवान श्रीकृष्णाच्या नगरीत परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सान्निध्यात सहभागी झालेले सारे सेवेकरी भाग्यवान आहेत. पुढील सात दिवस अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे आपल्या हातून सेवा घडेल अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. सकाळी सात वाजता पितृतर्पणाचा विधी पार पडला. त्यानंतर सर्वांनी मनोभावे आणि श्रद्धेने भागवताचे सामुदायिक पठण केले.

शनिवारी नारायण कवच धारण विधी..

पारायणाच्या दुसऱ्या दिवशी २८ जून रोजी असाध्य आजार, ग्रहपीडा निवारण्यासाठी नारायण कवच विधी होणार आहे.सकाळी नेहमीप्रमाणे वाचन झाल्यानंतर दुपार सत्रात हा विशेष उपक्रम होणार आहे. दर दिवशी अशा विशेष सेवा आणि उपक्रम घेण्यात येणार आहेत. तर सांगतेला ४ जुलै रोजी विष्णू याग,श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन व सत्यनारायण पूजन या विशेष सेवा होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!