– प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच
पंचवटी – प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ ब),
उर्मिला सुनिल निरगुडे (१ क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ ड) यांचे पारडे मतदारांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे जड झाले. शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात असून ‘आता बोलायचं नाही आता परिवर्तन करून दाखवायचे !’ अशी खूणगाठ मतदारांनी व समर्थकांनी बांधली आहे.
शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या अभेद्य युतीमुळे प्रभाग एकमध्ये भगवामय वातावरण. ‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला निवडू या धनुष्य’ असा संदेश मतदारांमध्ये चर्चिला जात आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना दिलेले मत म्हणजे विकासाला मत असून गेल्या २५ वर्षांपासून महानगर पालिकेच्या टक्केवारीतून कमावलेले पैसे नागरिकांच्या हक्काचे आहे. भले ते घेऊ मात्र यंदा परिवर्तन करू, असा ठाम विश्वास मतदारांनी केला आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१ क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ ड) यांनी घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेतल्या. या भेटीत प्रभागाच्या प्रलंबित विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी धनुष्य बाण या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांचा प्रतिसाद पाहता शिवसेना उमेदवारांचा विक्रमी विजय काळ्या दगडावरची पांढरी रेघ असून १६ जानेवारीस विजयाचा गुलाल आपलाच, असा आत्मविश्वास शिवसैनिकांसह मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.


























