Homeक्राईमघरफोडी, दुचाकी चोरी व मोबाईल स्नॅचिंग करणारे दोन सराईत जेरबंद; म्हसरूळ पोलिसांच्या...

घरफोडी, दुचाकी चोरी व मोबाईल स्नॅचिंग करणारे दोन सराईत जेरबंद; म्हसरूळ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी – प्रतिनिधी
म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी तसेच दुचाकी चोरी करून मोबाईल स्नॅचिंग करणारे दोन सराईत जेरबंद करण्यात म्हसरूळ गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ५५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात विशेषत: दोन दिवसात घडलेल्या गुन्ह्यांची देखील उकल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार सतिष वसावे, अंमलदार मनोज आहेर व पंकज चव्हाण यांना दोघे जण चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरीता म्हसरूळ गाव, वरवंडी रोड येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी म्हसरूळ गाव येथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार दोघे जण एका मोटार सायकलवर येताना दिसले. त्यांच्याजवळ एक बॅग होती. त्यांचे संशयास्पद हालचालीवरून माहितीची खात्री झाल्याने छापा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्या दोघांना मोटार सायकलसह तात्काळ ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे यांनी त्यांचे नाव विचारले असता त्यांनी रितेश भाउसाहेब चव्हाण (वय २६, रा. फ्लॅट नं १०, राजमुद्रा सोसायटी, सप्तरंग मागे, पेठरोड) व साहिल केशव निकम (वय २२ वर्ष, रा. फ्लॅट नं ०४, श्रीराम पार्क, वाढणे कॉलनी, म्हसरूळ) असे सांगितले. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल व त्यांच्या जवळ असलेल्या बॅग मधील लॅपटॉपच्या मुळ मालकाची माहिती घेत असताना ती मोटार सायकल व लॅपटॉप हा चोरीचा असल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले व तपास कौशल्याचा वापर करून त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.

त्या दोघांकडून एकुण ६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपींकडून एकुण ३ लाख ५५ हजार रूपये किमतीचे ६ मोबाईल हॅण्डसेट, १ लॅपटॉप, ३ दुचाकी, व मद्य असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त आयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त श्रीमती संगिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक दिपक पटारे, सहाय्यक उपनिरीक्षक बाळासाहेब मुर्तडक, हवालदार सतिष वसावे, देवराम चव्हाण, राकेश शिंदे, प्रशांत वालझाडे, अंमलदार मनोज आहेर, पंकज चव्हाण, पंकज महाले, ज्ञानेश्वर कातकाडे, गुणवंत गायकवाड, स्वप्नील गांगुर्डे, भाउराव गवळी, नितिन पारधे, योगेश सस्कर यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी घडलेले गुन्हे उघडकीस…

दोन्ही आरोपींपैकी रितेश चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी २०२२, २०२३ मध्येही गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी चाणक्य सोसायटी, किशोर सूर्यवंशी मार्ग येथून १ लाख २५ हजार रूपये किमतीची पल्सर (एम.एच १५ – एफ बी २५४३) ही दुचाकी चोरी झाली होती.तसेच कंसारा माता चौकात भाजीपाला घेण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून नेला होता. ओंकार नगर येथे असलेल्या संतोष बियर अँड वाईन शॉपीचे दुकान फोडून बिअर आणि वाईन बाटल्या चोरून नेल्या होत्या.अशा दोन दिवसापूर्वी घडलेले गुन्हे देखील या आरोपींकडून उघडकीस आले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येऊन अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अंकुश चिंतामण
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!